ISIS warns shia Muslims targeted in Afghanistan
ISIS warns shia Muslims targeted in AfghanistanDainik Gomantak

ISIS ने दिली शिया मुस्लिमांना धमकी

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) ने शिया मुस्लिमांना (shia Muslims) इशारा दिला आहे.
Published on

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) ने शिया मुस्लिमांना (shia Muslims) इशारा दिला आहे. मीडिया रिपोर्टने आयएसच्या एका वक्तव्याचा हवाला देत म्हटले आहे की शिया मुस्लिम हे धोकादायक आहेत आणि त्यांना सर्वत्र लक्ष्य केले जाईल.इस्लामिक स्टेटने आपल्या साप्ताहिक अल-नबामध्ये एक चेतावणी प्रकाशित केली आहे. खामा प्रेसने नोंदवले आहे की त्यात असे म्हटले आहे की ' शिया मुस्लिमांना त्यांच्या घरांवर आणि केंद्रांवर लक्ष्य केले जाईल.' या विधानामुळे विशेषतः अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) राहणाऱ्या शिया मुस्लिमांना धोका निर्माण झाला आहे.(ISIS warns shia Muslims targeted in Afghanistan)

खामा या प्रेसच्या मते, तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर आयएसआयएस खोरासन आता अफगाणिस्तानातील शांततेसाठी सर्वात मोठा धोका आहे. बगदादपासून खोरासानपर्यंत सर्वत्र शिया मुस्लिमांना लक्ष्य केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतातील शिया मशिदीत शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली स्फोटात 60 पेक्षा जास्त लोक ठार आणि 80 हून अधिक जखमी झाल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. IS-K ने या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती.

ISIS warns shia Muslims targeted in Afghanistan
अफगाणिस्तान पुन्हा हादरलं, कंधारमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात 62 जणांचा मृत्यू

दरम्यान काहीदिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमधील कुंदुज शहरातील मशिदीच्या आत बॉम्बस्फोट झाला होता ज्यात 80 लोक ठार झाले होते आणि बरेच लोक जखमी देखील झाले होते. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती. झालेल्या स्फोटावेळी देखील परिसरातील शिया मुस्लिम मोठ्या संख्येने मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मोठ्या बॉम्बस्फोटानंतर मशीद धूराने भरली होती. धूर साफ झाल्यानंतर आजूबाजूचे लोक मशिदीच्या आत पोहोचले तेव्हा लोकांचे विस्कटलेले मृतदेह पडलेले होते.

तालिबान आणि आयएस या सुन्नी मुस्लिमांच्या अतिरेकी संघटना आहेत. शिया लोकसंख्येचा सर्वात मोठा देश असलेल्या इराणने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. काबूलमधील इराणी दूतावासाने तालिबान्यांनी दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी ठोस व्यवस्था करावी अशी अपेक्षा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com