Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानची हवा टाईट! POK मध्ये पर्यटकांवर बंदी, मदरसे 10 दिवस बंद ठेवण्याचे आदेश

Pakistan Government: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून, पीओकेमधील परिस्थितीही वेगाने बदलत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पाकिस्तान: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही, पर्यटक काश्मीरमधील अनेक ठिकाणांना भेट देत आहेत. काश्मीरमधून पर्यटकांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे माध्यमांद्वारे सतत आपल्यापर्यंत येताहेत. पण, पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये मात्र अगदी उलट परिस्थिती आहे.

पाकिस्तानकडून पर्यटकांना नीलम व्हॅली आणि पीओकेमधील नियंत्रण रेषेच्या (LOC) आसपासच्या भागात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. काही गडबड झाल्यास पीओकेमध्ये आणीबाणी लागू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले होते.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून, पीओकेमधील परिस्थितीही वेगाने बदलत आहे.

तसेच, सरकारने परिसरातील सर्व मदरसे १० दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या मते, भारताने हल्ला केला तर या भागातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट्स आणि लग्नाच्या सभागृह पाकिस्तानी सैन्याकडे सोपवण्याची तयारी येथील आस्थापनांच्या मालकांनी केली आहे.

दोन्ही देशांनी एकमेकांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र देखील बंद केले आहे. कराची आणि लाहोर - हवाई क्षेत्र मे महिन्यापर्यंत दररोज ८ तास बंद राहील, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

"पीओकेचे सरकारचे प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सरकार लोकांना अन्न, औषधे आणि इतर मूलभूत गरजा पुरवण्याची व्यवस्था करत आहे. याशिवाय, सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना २ महिन्यांचा रेशनचा साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत", असे पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

SCROLL FOR NEXT