Suzuki Alto price in Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

"आमच्याकडे 20-30 हजारांत मिळते", पाकिस्तानमध्ये जुनी 'Alto' चक्क 24 लाखांना, भारतीय नेटकऱ्यांनी घेतली चांगलीच फिरकी Watch Video

Suzuki Alto price in Pakistan: सध्या पाकिस्तानमध्ये महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेमुळे तिथे वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

Sameer Amunekar

सध्या पाकिस्तानमध्ये महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेमुळे तिथे वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच आता सोशल मीडियावर एका जुन्या सुझुकी ऑल्टो कारचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. २०२१ च्या मॉडेलची ही जुनी कार चक्क २४ लाख पाकिस्तानी रुपयांना विकली जात असल्याचे पाहून केवळ पाकिस्तानच नव्हे, तर भारतीय नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

२४ लाखांची ऑल्टो? किंमत ऐकून डोळे पांढरे

सोशल मीडियावर 'nykmotors3' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका सेकंड-हँड कारची विक्री सुरू असल्याचे दिसते. गाडीचा मालक कारची अवस्था चांगली असल्याचे सांगत असताना, जेव्हा तिच्या किमतीचा खुलासा झाला, तेव्हा उपस्थितांना धक्काच बसला. २०२१ चे मॉडेल असलेल्या या ऑल्टोसाठी मालक २४ लाख रुपयांची मागणी करत आहे. भारतात या किमतीत नवनवीन प्रगत एसयूव्ही (SUV) मिळू शकतात, हे वास्तव समोर येताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

भारतीय नेटकऱ्यांची तुफान फटकेबाजी

हा व्हिडिओ व्हायरल होताच भारतीय नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या या दुर्दशेवर खोचक टीका करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने उपरोधिकपणे म्हटले की, "इतक्या पैशात मी भारतात ऑल्टोचा पूर्ण शोरूमच उघडेन!" तर दुसऱ्या एकाने कमेंट केली, "आमच्याकडे अशा प्रकारची जुनी ऑल्टो २०-३० हजार रुपयांत सहज मिळते." काहींनी तर "या किमतीत भारतात बीएमडब्ल्यू (BMW) येईल," असे म्हणत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची चांगलीच थट्टा उडवली आहे. पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम थेट वाहन बाजारावर झाला असून, सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आता कार खरेदी गेली आहे.

महागाईचे दुष्टचक्र आणि सामान्य नागरिक

पाकिस्तानमधील इंधन संकट आणि वाढती महागाई पाहता, तिथे जुन्या गाड्यांचे भावही आता नवीन गाड्यांना टक्कर देऊ लागले आहेत. इंधनाचे दर ३०० रुपयांच्या पुढे गेल्याने आधीच नागरिक त्रस्त आहेत, त्यात वाहनांच्या या अवास्तव किमतींनी सर्वांच्याच चिंतेत भर घातली आहे. हा व्हिडिओ केवळ एका कारचा नसून, ती पाकिस्तानच्या विदारक आर्थिक स्थितीचे एक प्रतीक बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT