पाकड्यांचा काही नेम नाही, ते केव्हा काय करतील याची कुणालाच कल्पना नसते. नुकतेच पाकिस्तानी सैन्याने एक चमत्कारीक कारनामा केलाय, तो म्हणजे सैन्याने त्यांचाच प्रांतात हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात ३० निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लढाऊ विमानांनी सहा बॉम्ब टाकले.
समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने सोमवारी खैबर पख्तूनख्वा प्रांतात हवाई हल्ल्या केला. तिरह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एकूण आठ एलएस-६ बॉम्ब टाकण्यात आले. या बॉम्ब हल्ल्यात मोठा नरसंहार झाला. यात महिला आणि मुलांसह किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यात अनेक नागरिक जखमी देखील झाले आहेत.
पाकिस्तानी सैन्याकडून मात्र या हवाई हल्ल्याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. पण, स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार यात ३० जण ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ आणि फोटो देखील समोर आले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने मात्र ही दहशतवाद विरोधी कारवाई असल्याचे म्हटले आहे.
खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट काळात या प्रातांत ६०५ दहशतवादी कारवाया झाल्या, यामध्ये १३८ निष्पाप नागिरकांचा तर ७९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक १२९ घटना घडल्या, यात सहा पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट झाल्यानंतर जैश – ए – मोहम्मद आणि हिजबूल मुज्जाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटना खैबर पख्तूनख्वा प्रांतात नवे तळ स्थापन करत आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगत देखील दहशतवादी तळ उभारण्यात आल्याची माहिती आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.