Pakistan & Afghanistan agree to restart bus service between Peshawar to Jalalabad
Pakistan & Afghanistan agree to restart bus service between Peshawar to Jalalabad Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तान- पाकिस्तानमध्ये सुरू होणार बस सेवा

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तान (Pakistan) दरम्यान बंद असलेली 'मैत्री' बस सेवा (Bus Service) पाच वर्षांनंतर पुढील वर्षी पूर्ववत होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळाने केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व काळजीवाहू अर्थमंत्री अमीर खान मुत्तकी (Amir Khan Muttaqi) यांनी केले होते. (Pakistan & Afghanistan agree to restart bus service between Peshawar to Jalalabad)

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावर आणि अफगाणिस्तानमधील जलालाबाद दरम्यान बससेवा पूर्ववत केली जाणार आहे . दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांकडून मंजुरी मिळाल्यानंतर बससेवेला मी,मंजुरी दिली जाईल, असे अफगाण शिष्टमंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. "पाकिस्तानने बस सेवा पुनर्संचयित करण्याच्या अफगाणच्या अर्थमंत्र्यांच्या विनंतीचे स्वागत केले आणि पुढील वर्षी दोन देशांमधील सेवा पुन्हा सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले," अधिकाऱ्यांनी सांगितले. बलुचिस्तान प्रांतातूनही अशीच बससेवा सुरू करण्याची इच्छा शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र सहाय्यताचे तसेच संयुक्त राष्ट्र महासचिवांचे उप विशेष प्रतिनिधी मेट नूडसेन हे मानवतावादी सहाय्याच्या गरजेसह विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी तालिबानसह देशातील सर्व भागधारकांशी चर्चा करत आहेत. शनिवारी, त्यांनी काबूलमधील महिला धार्मिक विद्वानांची भेट घेतली आणि इस्लामिक कायदा आणि महिला संबंधित समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे .

दरम्यान तालिबान सरकार इतर देशांसोबत सबंध सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. त्याच अनुषंगाने नुकतेच अफगाणिस्तानातील तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी पुन्हा एकदा तालिबानची इतर देशांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानला भारतासह कोणत्याही देशाशी संघर्ष नको आहे.अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. प्रथमच एका महिला पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, अफगाणिस्तानने कोणत्याही देशाशी संघर्ष करावा किंवा देशाला प्रभावित करणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Fatal Accident: अपघातानंतर दोघेही अर्धातास वाहनात अडकून पडले, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

OCI Issue : ओसीआय प्रकरणी फसवणूक नाही! मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

Goa Today's Live News: विकट भगत विरोधात पुन्हा गुन्हा नोंद

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

SCROLL FOR NEXT