Abdul Majeed  Dainik Gomantak
ग्लोबल

Abdul Majeed Death: 6 महिलांशी विवाह, 54 मुलांचा बाप; अब्दुल मजीद यांचा मृत्यू

Abdul Majeed Death: पाकिस्तानमधील अब्दुल मजीद मेंगल नावाच्या व्यक्तीची अशी ओळख होती की, तो 54 मुलांचा बाप होता.

दैनिक गोमन्तक

Abdul Majeed Death: पाकिस्तानमधील अब्दुल मजीद मेंगल नावाच्या व्यक्तीची अशी ओळख होती की, तो 54 मुलांचा बाप होता. आता अब्दुल मजीद या जगात नाहीत. 54 मुलांचे वडील असलेल्या मजीद यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानातील सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचे बलुचिस्तानमधील मोश्की येथे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मजीद यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

दरम्यान, अब्दुल मजीद (Abdul Majeed) यांनी आपल्या हयातीत 6 महिलांशी लग्न केले होते. यातील 2 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जिवंत आहेत. मजीद यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

42 मुले अजूनही जिवंत आहेत

पाकिस्तानी मीडियानुसार, अब्दुल मजीद यांना एकूण 54 मुले होती, त्यापैकी 12 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. मजीद यांच्या 54 मुलांपैकी 42 अजूनही जिवंत आहेत. 42 पैकी 22 मुले आणि 20 मुली आहेत. अब्दुल मजीद यांच्याशी संबंधित एक कथा पाकिस्तानमध्ये (Pakistan) खूप गाजली आहे.

खरे तर, 2017 मध्ये, जेव्हा पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय जनगणना केली जात होती, तेव्हा सरकारी अधिकारी मजीद यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या पाहून चक्रावून गेले होते. यानंतर मजीद आपल्या देशात चर्चेत आले होते. मजीद यांची ही गोष्ट ऐकून अधिकार्‍यांच्या पायाखालची जमीन सरकली, जेव्हा मजीद यांनी मला शंभर मुलांचा बाप व्हायचे आहे, असे म्हटले.

मी खूप मेहनत केली...

पाकिस्तानमध्ये अब्दुल मजीद यांच्या आधी जान मोहम्मद नावाचा व्यक्ती 36 मुलांचा बाप होता. मजीद हे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचे. त्यांचे पहिले लग्न वयाच्या 18 व्या वर्षी झाले, त्यानंतर त्यांनी पाच महिलांशी (Women) लग्न केले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मजीद एकदा म्हणाले होते की, "मी खूप मेहनत केली आणि माझ्या मोठ्या मुलाला चांगले शिक्षण दिले. पण, आता मी म्हातारा झालो आहे, या गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्या आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT