Pakistan PM Shehbaz Sharif: तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपानंतर संपूर्ण जग हादरले आहे. भूकंपामुळे 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी झाले असून अनेक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर तुर्कस्तान आणि सीरियाच्या मदतीसाठी संपूर्ण जग पुढे आले आहे.
दरम्यान बचावकार्यासाठी सर्व देश आपापली टीम पाठवत आहेत. भारतनेही (India) मदतीसाठी एनडीआरएफ टीम, डॉक्टर्स, मेडिकल टीम यासह मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली आहे. यासोबतच, खडतर परिस्थितीतून जात असलेल्या पाकिस्ताननेही मदत पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र तुर्कस्तानने त्याला चांगलेच फटकारले.
दुसरीकडे, या दुर्घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि इतर अधिकाऱ्यांना तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्त भागाचा दौरा करायचा होता, परंतु तुर्की सरकारने फटकारले. सरकारने सांगितले की, 'आता आम्ही मदतकार्यात व्यस्त आहोत, त्यामुळे आता इथे येऊ नका.' त्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपला तुर्की दौरा रद्द केला.
या भेटीची माहिती पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांनी दिली. त्यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, 'पंतप्रधान बुधवारी सकाळी अंकाराला रवाना होतील. भूकंपामुळे (Earthquake) झालेला विध्वंस, जीवितहानी आणि तुर्कस्तानच्या लोकांबद्दल ते राष्ट्राध्यक्ष (रेसेप तय्यिप) एर्दोगान यांना शोक व्यक्त करतील.'
पंतप्रधानांच्या तुर्की दौऱ्यामुळे गुरुवारी बोलावण्यात आलेली एपीसी पुढे ढकलण्यात आली असून, मित्रपक्षांशी चर्चा करुन नवीन तारीख जाहीर केली जाईल.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी आलेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी होती. या भूकंपामुळे सुमारे 4 हजार 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, हजारो लोक बेपत्ता असून हजारो जखमीही आहेत. येथे सर्वत्र बचावकार्य सुरु आहे.
तसेच, तुर्कस्तानमध्ये सोमवारपासून आतापर्यंत 4 भूकंप झाले आहेत. 24 तासांत झालेल्या भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 7.8, 7.6, 6.0 आणि 5.6 इतकी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) दावाही समोर आला आहे. भूकंपामुळे मृतांची संख्या 8 पटीने वाढू शकते, असे WHO ने म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.