Arrested Dainik Gomantak
ग्लोबल

Qatar: हेरगिरी प्रकरणात भारतीय नौदलाच्या 8 अधिकाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा? PAK मीडियाचा खळबळजनक दावा

Qatar News: हेरगिरीच्या आरोपाखाली आठ महिन्यांपासून कतारमध्ये अटकेत असलेल्या आठ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते.

Manish Jadhav

Qatar News: हेरगिरीच्या आरोपाखाली आठ महिन्यांपासून कतारमध्ये अटकेत असलेल्या आठ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या अहवालात करण्यात आला आहे.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, आरोपींची ओळख भारताच्या (India) गुप्तचर एजन्सी, रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) साठी काम करत होते आणि कतारमध्ये हेरगिरी करत असताना पकडले गेले.

पाक मीडियाच्या रिपोर्टमध्ये आणखी काय म्हटले आहे

एक्स्प्रेस ट्रिब्यूनचे म्हणणे आहे की, अटक केलेल्या अधिकार्‍यांनी कतारच्या इटलीकडून अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याच्या गुप्त कार्यक्रमाची माहिती दिली आहे.

वृत्तानुसार, याच प्रकरणात एका खासगी संरक्षण कंपनीचे सीईओ आणि कतारच्या (Qatar) आंतरराष्ट्रीय लष्करी ऑपरेशन्सच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे, भारतीय नौदलाचे आठही अधिकारी या कंपनीत काम करत होते. 3 मे रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीत आरोपींवर गंभीर आरोप लावण्यात आल्याचा दावा वृत्तपत्राने केला आहे. कतारी अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांच्याकडे आरोपांचे समर्थन करणारे तांत्रिक पुरावे आहेत.

अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना परवानगी दिली

दरम्यान, एका भारतीय मीडिया रिपोर्टनुसार, ऑगस्ट 2022 पासून दोहामध्ये बंदिवान असलेल्या भारतीय नौदलाच्या माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. दहरा कन्सल्टन्सीज कंपनीने या भेटीची सोय केली होती, ज्यासाठी ते काम करत होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका सूत्राने सांगितले की, "दहाराकडून याकडे सद्भावना म्हणून पाहिले जात आहे. कंपनीने विमान प्रवास आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर, प्रवास निर्विघ्न होईल याची खात्री केली आहे." दहराने आधीच अधिकार्‍यांना सेवरन्स पॅकेज ऑफर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT