Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: रशियन-नियंत्रित शहरावर बेछूट गोळीबार, 10 जण ठार; ढिगाऱ्याखालून पाच जणांना जिवंत काढले

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनच्या शहरांना लक्ष्य करत आहे.

Manish Jadhav

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनच्या शहरांना लक्ष्य करत आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या खार्व्हिव शहरावर रशियाने हवाई हल्ला केला होता. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या झापोरिझिया भागातील रशियन-व्याप्त शहरात झालेल्या गोळीबारात तीन मुलांसह दहा जण ठार झाले. झापोरिझिया (Zaporizhia) हा रशियाच्या सैन्याने अंशत: ताब्यात घेतलेल्या चार युक्रेनियन प्रदेशांपैकी एक आहे.

क्रेमलिनने युक्रेनला जबाबदार धरले

क्रेमलिनच्या स्थानिक अधिकाऱ्याने या हल्ल्यासाठी युक्रेनला जबाबदार धरले आहे. यावर युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनीही रशियावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे, ज्यामध्ये तीन युक्रेनियन ठार झाले आहेत. या भागात तैनात असलेले क्रेमलिनचे अधिकारी येव्हेन बालितस्की यांनी सांगितले की, रशियन आपत्कालीन सेवा कर्मचारी टोकामाकमधील घरांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शनिवारी कठोर परिश्रम घेत होते. तीन अपार्टमेंटवर गोळीबार झाला. एकूण 18 जण जखमी झाले असून त्यापैकी 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी, ढिगाऱ्याखालून पाच जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

चीन रशियाला मदत करत असल्याचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या फोन कॉलमध्ये रशियाच्या संरक्षण औद्योगिक तळासाठी चीनच्या समर्थनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, सीएनएनने दिलेल्या वृत्तात बायडन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, युक्रेनमध्ये कार्यरत असलेला चीन रशियाला संरक्षण तळ वाढवण्यास मदत करत आहे. चीनच्या मदतीने, मॉस्को आता सोव्हिएत काळापासून लष्करी उत्पादनाचा सर्वात लक्षणीय विस्तार करत आहे. रशियातच ड्रोन निर्मितीसाठी संयुक्त काम केले जात आहे. चीनच्या पाठिंब्यामुळे रशियाला युक्रेनवर हल्ला सुरु ठेवण्यास मदत होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT