Masood Azhar  Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Sindoor: 'माझ्या परिवाराला जन्नत नसीब झाली...', भारताच्या कारवाईत कुटुंबातील 14 जण ठार झाल्यानंतर मसूद अझहरची प्रतिक्रिया

Masood Azhar Family Killed: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये मसूदची पत्नी, मुलगी आणि भाऊ देखील समाविष्ट आहेत. याशिवाय, मसूद अझहरचा भाऊ रौफ अझहरही मारला गेला आहे.

Manish Jadhav

भारताने पहलगाम हल्ल्याचा तब्बल 15 दिवसांनी बदला घेतला. भारताने पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवत जशास तसे उत्तर दिले. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानी सीमेपासून 100 किलोमीटर आत घुसून भारताने ही यशस्वी कारवाई केली. भारताच्या या कारवाईनंतर सध्या पाकिस्तानात भीतीचे वातावरण आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि त्याच्या कुटुंबातील 14 जणांचा भारताकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये मृत्यू झाला. यानंतर मसूद अजहरची प्रतिक्रिया आली. तो म्हणाला की, 'या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते.'

दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांची हत्या

दरम्यान, भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये मसूदची पत्नी, मुलगी आणि भाऊ देखील समाविष्ट आहेत. याशिवाय, मसूद अझहरचा भाऊ रौफ अझहरही मारला गेला आहे. भारतीय लष्कराने बहावलपूरमधील दहशतवादी मसूद अझहरच्या मदरशाला टार्गेट केले. बहावलपूरमधील या मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्यामध्ये संपूर्ण संकुल उद्ध्वस्त झाले. या मदरशाचे नाव मरकज सुभानअल्लाह होते. हे संकुल जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय होते. बहावलपूरमधील हा मदरसा जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि इतर अनेक दहशतवाद्यांचेही घर होते. गेल्या तीन दशकांपासून या मदरशात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरु आहेत.

या हल्ल्यानंतर मसूद अझहर याचे वक्त्यव्य समोर आले आहे. तो म्हणाला की, या हल्ल्यात मी ही मेलो असतो तर बरे झाले असते. माझ्या परिवाराला जन्नत नसीब झाली. जैश-ए-मोहम्मदने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, "मौलाना कशफ याचे संपूर्ण कुटुंब तसेच मौलाना मसूद अझहर याच्या मोठ्या बहिणीसह 14 कुटुंबीय मारले गेले. मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातवंडे, बाजी सादिया यांचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि मुले मारली गेली आहेत."

लष्कर-ए-तोयबाचे तळ उद्ध्वस्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचा बदला घेण्यासाठी आणि भारतात (India) दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवाद्यांना संपवण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले. पाकिस्तानमधील (Pakistan) मुझफ्फराबाद, मुदिरके, कोटली आणि बहावलपूर येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हे हल्ले करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT