Operation Sindoor: भारताच्या धडक कारवाईत लष्कर-ए-तोयबासह टॉप 6 दहशतवादी कमांडर ठार! कसाबने घेतलेले ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त

Lashkar-e-Taiba Commanders Killed: पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करुन चोख प्रत्युत्तर दिले.
Lashkar-e-Taiba Commanders Killed
Lashkar-e-Taiba Commanders KilledDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करुन चोख प्रत्युत्तर दिले. 'ऑपरेशन सिंदूर' राबवत भारताने पाकिस्तानमध्ये 100 किमी आत घुसून लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सशस्त्र दलांनी भारतावरील अनेक हल्ल्यांमागे असलेल्या या दहशतवादी छावण्या ओळखून त्यांना टार्गेट केले. आता अशी बातमी समोर येत आहे की, भारताच्या या धडक कारवाईत लष्कर-ए-तैयबाच्या 2 टॉप दहशतवादी कंमाडरसह 4 जण मारले गेले आहेत.

टॉप दहशतवादी ठार

दरम्यान, लष्कर-ए-तैयबाचे 2 टॉप कमांडरपैकी एक हाफिज अब्दुल मलिक आहे, जो लष्करचा एक मोठा ऑपरेशनल कमांडर असल्याचे सांगितले जाते. तो मुरीदके येथील लष्कराच्या मुख्यालय 'मरकझ तैयबा' येथे उपस्थित होता, जिथे तो मारला गेला. तर दुसरा दहशतवादी मुद्दासिर होता, जो परदेशी दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या लष्करच्या कटाचा सूत्रधार मानला जातो. या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Lashkar-e-Taiba Commanders Killed
Operation Sindoor: तीन भारतीय जेट आणि एक ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावा; दहशतवादी नव्हे नागरिक मारल्याची रडरड सुरु

ऑपरेशन सिंदूर हे गुप्तचर संस्था आणि लष्कराच्या विशेष पथकांनी संयुक्तपणे राबवले. या कारवाईकडे भारताचे दहशतवादाविरुद्धचे कठोर धोरण म्हणून पाहिले जात आहे. त्याचवेळी, या पावलानंतर भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेश दिला की, ते आपल्या सार्वभौमत्वाशी आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेशी अजिबात तडजोड करत नाहीत.

Lashkar-e-Taiba Commanders Killed
Operation Sindoor: तीन भारतीय जेट आणि एक ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावा; दहशतवादी नव्हे नागरिक मारल्याची रडरड सुरु

अजमल कसाबने घेतलेले ट्रेनिंग सेंटर उडवले

भारताने टार्गेट केलेल्या दहशतवादी अड्ड्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट आहे. याशिवाय, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले. सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये करण्यात आला, जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी आत आहे. येथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे.

तर दुसरीकडे, सांबा सेक्टर सीमेपासून 30 किमी अंतरावर असलेले मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचा तळही उडवून देण्यात आला. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी येथूनच आले होते. विशेष म्हणजे, दहशतवादी अजमल कसाबने मुरिदके येथीलच ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेतले होते. याशिवाय, डेव्हिड हेडली आणि तहव्वुर राणा यांनीही या सेंटरला भेट दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com