Texas Mall Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Texas Mall Shooting: टेक्सास मॉलमध्ये गोळीबार; एक ठार, तीन जखमी

गोळीबारप्रकरणी एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Pramod Yadav

टेक्सासमधील एल पासो, शॉपिंग मॉलमध्ये (Cielo Vista Mall) बुधवारी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

(One killed, three wounded in Texas mall shooting)

पोलिस प्रवक्ते, रॉबर्ट गोमेझ यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारप्रकरणी एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण, अद्याप या गोळीबाराचा हेतू कळू शकला नाही. पोलिसांनी हा परिसर संवेदनशील म्हणून घोषीत केला असून, नागरिकांनी शक्यतो या क्षेत्रात येणे टाळावे असे म्हटले आहे.

"मॉलमध्ये सध्या मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली असून, घटनेचे साक्षीदार यांच्याशी चर्चा सुरू आहे. जखमी लोकांच्या बाबत कोणतीही माहिती नाही." असे गोमेझ

एल पासो पोलिस, टेक्सास डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी आणि यूएस बॉर्डर पेट्रोल यासह अनेक कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी सध्या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

Cielo Vista हा मॉल वॉलमार्ट स्टोअरच्या शेजारी आहे. वॉलमार्ट स्टोअरमध्ये 3 ऑगस्ट 2019 रोजी एका बंदुकधारी व्यक्तीने 23 लोकांची हत्या केली होती.

एका आठवड्यापूर्वी, टेक्सासच्या एका व्यक्तीने त्या हत्याकांडात एका व्यक्तीला दोषी ठरवले असून, त्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली आहे. याशिवाय त्याला एका राज्य खटल्यात फाशीची शिक्षा भोगावी लागत आहे.

गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळ सुरक्षित करण्यात आले आणि पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीपर्यंत सर्व इमारत रिकामी करून प्राथमिक तपास सुरू केला, असे पोलिसांनी सांगितले.

गोमेझ म्हणाले की, मॉलमधील फूड कोर्टच्या आजूबाजूला गोळीबार झाला असे तपासकर्त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. तपासात मदत करण्यासाठी, एफबीआयने लोकांकडून घटनेचे फोटो आणि व्हिडिओ जमा करण्यासाठी एक वेबसाइट तयार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

Goa Live News: पर्वरी येथे 'रेंट-अ-कार' आणि टुरिस्ट टॅक्सीचा अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

Goa ZP Election: गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ! कोलवाळ, हळदोणे, शिरसईत नारीशक्तीचे वर्चस्‍व; सत्तरीतील मतदारसंघांत मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT