Akshata Murty In Goa: 'ब्रिटनमधील गोयकारांची काळजी घ्या', गोव्यात आलेल्या ऋषी सुनक यांच्या पत्नीकडे कोणी केली ही विनंती?

गोव्यात सुनक यांच्या कुटुंबीयांनी जेट स्कीवरून केली समुद्रात सैर.
Akshata murty In Goa
Akshata murty In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Akshata Murty In Goa: भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक (UK Prime Minister Rishi Sunak) यांच्या पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांनी आपल्या कुटुंबीयांसह गोव्यात सुट्टी एन्जॉय केली.

बाणावली येथील समुद्रकिनाऱ्यावर फेरफटकाही मारला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुले आणि आई सुधा मूर्ती देखील होत्या.

सुनक यांच्या कुटुंबीयांनी जेट स्कीवरून समुद्रात सैर केली. यावेळी सुनक यांच्या पत्नी आणि गोव्यातील व्यावसायिक यांच्यात संवाद झाला. हा संवाद सध्या गोव्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

गोव्यातील स्थानिक असलेले पेले फर्नांडिस (Pele Fernandes) मच्छिमारीसह जलक्रिडा संबधित व्यावसाय करतात. पेले आणि अक्षता मूर्ती यांच्यात झालेला संवाद सध्या व्हायरल होत आहे.

पेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षता मूर्ती यांना जेट स्की राईड (Jet Ski Ride In Goa) बाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी गोव्यात पाण्यातील असे खेळ सुरक्षित आहेत का? असा प्रश्न केला. त्यावर फर्नांडिस यांनी शंभर टक्के सुरक्षित आहेत असे उत्तर दिले.

तसेच, बोटवर मी तुमच्या मुलांची योग्य काळजी घेईन असेही पेले यांनी मूर्ती यांना आश्वस्त केले.

Akshata murty In Goa
Rishi Sunak Wife In Goa: घाबरू नका... UK पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीची गोव्यात जेट स्की राईड

दरम्यान, यावेळी पेले यांनी 'ब्रिटनमध्ये अनेक गोयकार आहेत, त्यांची काळजी घ्या' अशी विनंती केली. असे पेले म्हणाले.

दरम्यान, सुनक यांच्या पत्नी सुरुवातीला पाण्यात सैर करण्यासाठी थोड्या दचकल्याही; पण पेले फर्नांडिस या जलक्रीडा ऑपरेटरने त्यांना धीर दिल्यावर त्यांनी ही सैर केली. यावेळी फर्नांडीस यांनी त्यांना मिश्किलपणे म्हटले देखील, तुम्ही घाबरू नका, मी तुमची काळजी घेण्यासाठीच आहे. सुनक यांच्या पत्नीने गोव्यात आपली सुट्टी घालवल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com