Corona virus

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

ब्रिटेनमध्ये ओमिक्रॉनचा कहर, हिवाळ्यात होऊ शकतो 5000 लोकांचा मृत्यू !

कोरोना विषाणूच्या (Corona virus) नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव ब्रिटनमध्ये मोठ्याप्रमाणात वाढू लागला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना विषाणूच्या (Corona virus) नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव ब्रिटनमध्ये मोठ्याप्रमाणात वाढू लागला आहे. आरोग्या तज्ञांकडून सांगण्यात येत आहे की, जर सरकारने कडक निर्बंध लागू केले नाहीत तर या हिवाळ्यात दररोज 5,000 पेक्षा जास्त ओमिक्रॉन-संबंधित मृत्यू होऊ शकतात.

दरम्यान, ब्रिटनमध्ये (Britain) सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी रुग्णांची नोंद होत असताना हा इशारा देण्यात आला आहे. एका दिवसापूर्वी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत सांगण्यात आले आहे की, 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या 93,045 झाली आहे. हा आकडा गेल्या आठवड्याच्या तुलनेत 60 टक्क्यांनी अधिक आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ओमिक्रॉनची प्रकरणे (Omicron variant) दररोज दुप्पट होत असून वेगाने प्रसार होत आहे. लंडनमध्ये, ओमिक्रॉन प्रभावित भागातील रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या तीन तृतीयांशाने ओलांडली आहे. आजच्या प्रकरणांपैकी एक चतुर्थांश प्रकरणे एकट्या लंडनमध्ये आढळली आहेत. (UK Omicron Cases). 24 नोव्हेंबरपासून जगाला Omicron व्हेरिएंटपासून सतर्क राहण्यास सांगण्यात आले होते, त्या दिवसापासून प्रकरणांमध्ये पाच पटीने वाढ झाली. गेल्या 24 तासांत, एकट्या ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन बाधित 3201 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामुळे Omicron व्हेरिएंटबाधित एकूण प्रकरणांची संख्या 14,909 झाली आहे.

डेल्टा पेक्षा कमी धोकादायक असल्याचा पुरावा नाही

इम्पीरियल कॉलेज लंडनचे प्रोफेसर नील फर्ग्युसन यांनी वाढत्या प्रकरणांमध्ये नव्या वर्षाच्या पाश्वभूमीवर निर्बंध वाढवण्याची मागणी केली आहे. फर्ग्युसन आणि त्यांच्या टीमला असे आढळून आले की, जरी कमी ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी निर्बंध न लावल्यास ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. ओमिक्रॉनने जानेवारीमध्ये (Lockdown in Britain) दररोज सुमारे 3000 मृत्यू नोंदवले आहेत. ओमिक्रॉन हे डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta variant) कमी धोकादायक असल्याचे दाखविणारा कोणताही पुरावा नाही, असेही त्यांनी सांगितले. संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की, लोकांना त्याचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता साडेपाच पट जास्त असून लस प्रभावी ठरताना दिसत नाही.

ख्रिसमस आणि नवीन वर्षावर लॉकडाऊन

प्रोफेसर नील फर्ग्युसन यांनी लॉकडाऊनशिवाय (Lockdown) पहिल्या लाटेत 5000 कोविड मृत्यूचा अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, संभाव्य नवीन लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी एक किंवा दोन आठवड्यात कठोर निर्बंध लागू करणे आवश्यक आहे. आता अशा नव्या सूचनांमुळे ब्रिटनमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षावर निर्बंध लावले जाऊ शकतात, अशी भीती निर्माण झाली आहे. तथापि, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले आहे की, जोपर्यंत रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढत नाही तोपर्यंत लॉकडाऊन लागू केला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT