जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid19) पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात वाढू लागला असतानाच दुसरीकडे कोरोनाचे नव नवे व्हेरिएंट चिंता वाढवत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ वेगवेगळ्या लसींचा शोध लावत आहेत. मात्र अद्याप ठोस असा परिणाम समोर आलेला नाही. यातच आता एका अभ्यासामधून मोठा दावा करण्यात आला आह की, मोनोक्लोनल अँटीबॉडी-ड्रग (Monoclonal antibody) कॉकटेल मृत्यूच्या जोखमीपासून आणि कोविड 19 डेल्टा व्हेरिएंटने ग्रसित असलेल्या रुग्णांना उपचारांपासून 100% संरक्षण प्रदान करते. मोनोक्लोनल अँटीबॉडी-ड्रग कॉकटेलने जगभरातील डॉक्टरांना COVID-19 साठी एक चमत्कारिक उपचार म्हणून आकर्षित केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जेव्हा त्यासंबंधीची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्याचे प्राथमिक वैज्ञानिक पुरावे पुरेसे नव्हते. त्याचबरोबर त्याची प्रभावशीलता दर्शवणारे अनेक अभ्यासही पुढे आले होते. जगभरात कोविड 19 च्या डेल्टा व्हेरिएंटवर कोणताही अभ्यास अद्याप समोर आलेला नाही.
डेल्टा व्हेरिएंटची थेरपी वरदान
एआयजी हॉस्पिटल्स, एशियन हेल्थकेअर फाऊंडेशन, CCMB हैदराबाद आणि इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस यांच्या सहकार्याने, मोनोक्लोनल थेरपी डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तींवर 100 टक्के प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. डेल्टा व्हेरिएंट, जो कोरोना विषाणूचा सर्वात घातक प्रकार आहे. तसेच तो इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा खूप वेगाने वाढतो आणि जीवघेणा बनतो.
भारतातील दुसरी लाट डेल्टा व्हेरिएंटमुळे आली
डेल्टा व्हेरिएंटमुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आली. एआयजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डी नागेश्वर रेड्डी म्हणाले की, या व्हेरिएंटचे परिणाम आश्चर्यकारक आहेत. तसेच कोविड-19 च्या उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य धोरणाला आकार देतील. आम्ही आमच्या संशोधनात स्पष्टपणे दाखवून दिले आहे की, मोनोक्लोनल थेरपी, योग्य वेळी दिल्यास रोगाचा प्रसार पूर्णपणे थांबतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.