<div class="paragraphs"><p>Omicron Variant: Britain changes rules regarding travel</p></div>

Omicron Variant: Britain changes rules regarding travel

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

Omicron Variant: ब्रिटनने प्रवासा संबंधित बदलले नियम

दैनिक गोमन्तक

ब्रिटेनमध्ये ओमिक्रॉन विषाणु संसर्गाच्या प्रकरणामध्ये वाढ झाली आहे. देशात दररोज 2, 18,724 ओमिक्रॉनचे प्रकरणे समोर येत आहेत. दरम्यान सरकारने (Government) प्रवासी नियमामध्ये (Rules) बदल केले आहेत. इंग्लंडमधील (England) आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्री-डिपार्चर स्क्रीनिंगची अट रद्द करण्यात आली आहे. कोविड संदर्भात प्रवास नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा करतांना सरकारने म्हंटले आहे की, आता प्रवासापूर्ता प्रवाशांची तपासणी करण्याची अट दूर करण्यात आली आहे. यासोबतच आता प्रवाशाना येताना क्वारंटाईन (Quarantine) होण्याची गरज नाही.

* निर्गमन संपण्यापूर्वी चेकिंगची गरज

पर्यटन (Tourism) उद्योगाने सरकारला प्रवास नियमांमध्ये बदल करण्याची विनंती केली होती आणि असे सांगण्यात आले की समुदायामध्ये ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव लक्षात घेता या प्रवाशांवर कोणताही परिणाम होणार नाही. अधिकृत आकडेवारी दर्शवते की 2021 च्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंडमधील 15 पैकी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची (Corona) लागण झाली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणतात की ओमिक्रॉन आता इतका पसरला आहे की या उपयांचा संक्रमणाच्या वाढीवर मर्यादित परिणाम होत आहे, तर प्रवासी उद्योगावरील खर्च कायम आहे.

* ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाची विक्रमी प्रकरणे

बोरीस जॉन्सन म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिन्यात घातलेली प्रवास बंदी आता अप्रभवी ठरली आहे. इंग्लंडमध्ये उद्यापासून प्री-डिपार्चर चेकची आवश्यकता काढून टाकू. त्यामुळे अनेक प्रवाशांना प्रवास करतांना अडचणी येत होत्या. रॅपिड अँटीजेन चाचणीत संसर्ग आढळल्यानंतर, पीसीआर चाचणी करणे अनिवार्य होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा विषाणुचा शिरकाव झाल्याने यात अनेक रुग्ण आढळून आले. अलीकडच्या काही दिवसात येथील दैनंदिन प्रकरणांची संख्या 200,000 च्या पुढे गेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT