उत्तर कोरियाने केली 'हायपरसॉनिक मिसाइल' ची चाचणी

उपासमारीने मरणाऱ्या लोकांची पर्वा न करता उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un) याने नवीन वर्षाची सुरुवात शस्त्रास्त्रांच्या प्रक्षेपणाने केली आहे.
Hypersonic Missile

Hypersonic Missile

Dainik Gomantak 

उपासमारीने मरणाऱ्या लोकांची पर्वा न करता उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने नवीन वर्षाची सुरुवात शस्त्रास्त्रांच्या प्रक्षेपणाने केली आहे. यावेळी किमने (Kim Jong Un) हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.

दरम्यान, बुधवारी करण्यात आलेली हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पडली असल्याचे उत्तर कोरियाच्या (North Korea) शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधानंतरही उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्रांची चाचणी करत सुटला आहे. त्यामुळे शेजारील देशासंह जगभरात तणाव वाढत चालला आहे. उत्तर कोरियाच्या या कृत्यांवर जपान आणि दक्षिण कोरियाही लक्ष ठेवून आहेत.

<div class="paragraphs"><p>Hypersonic Missile</p></div>
अण्वस्त्र आणि त्यांच्या वापराबाबत चीनने केले मोठे वक्तव्य

तसेच, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic Missiles) पृथ्वीवर परत येण्यापूर्वी अंतराळाच्या बाहेरील भागात उडतात, तर हायपरसॉनिक शस्त्रे कमी उंचीवरील लक्ष्यांकडे कूच करतात. त्यांचा वेग आवाजापेक्षा पाचपट जास्त आहे. हा वेग 6,200 किलोमीटर प्रति तास (3,850 mph) पर्यंत पोहोचू शकतो.

राज्य वृत्तसंस्था KCNA म्हणणे आहे की, "हायपरसोनिक क्षेपणास्त्र क्षेत्रात शस्त्रास्त्रांच्या प्रक्षेपणातील यश हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असून देश सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाच्या कामाला गती देत आहे."

शिवाय, बुधवारी पार पडलेल्या चाचणीमध्ये 'हायपरसॉनिक ग्लायडिंग वॉरहेड' त्याच्या रॉकेट बूस्टरपासून वेगळे झाले असून 700 किमी (435 मैल) अंतरावरील लक्ष्य गाठण्यापूर्वी 120 किमी (75 मैल) वेगाने पुढे गेल्याचे एजन्सीने म्हटले आहे. या चाचणीमुळे हे सिद्ध झाले आहे की, उड्डाण नियंत्रित केले जाऊ शकते त्याचबरोबर हिवाळ्यातही ते ऑपरेट करणे सोपे होऊ शकते.

<div class="paragraphs"><p>Hypersonic Missile</p></div>
ऑस्ट्रेलियात वाढले कोरोनाचे रुग्ण, भारतात वाजली धोक्याची घंटा!

दरम्यान, या क्षेपणास्त्राने 'मल्टी-स्टेप ग्लाइड जंप फ्लाइट आणि मजबूत मॅन्युव्हरिंग'चे संयोजन करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. तथापि, यामुळे अणुबॉम्ब किंवा लांब पल्ल्याची चाचणी झालेली नाही.

तज्ञांच्या मते, उत्तर कोरियाने 2017 पासून दक्षिण कोरिया आणि यूएस सारख्या क्षेपणास्त्र संरक्षणावर मात करण्याच्या उद्देशाने अधिक मोठ्याप्रमाणात युध्दाभ्यास सुरु केले आहेत. अलिकडच्या वर्षांत आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBMs) द्वारे, ज्या अंतर्गत क्षेपणास्त्रे आणि वारहेड्स विकसित आणि प्रक्षेपित केले गेले आहेत. कोरियाने सप्टेंबरमध्ये प्रथम हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ह्वासोंग-8 ची चाचणी घेतली. हायपरसोनिक शस्त्रे ही पुढील पिढीची शस्त्रे मानली जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com