Oldest Mother Of Africa Gave Birth to Twins Dainik Gomantak
ग्लोबल

Oldest Mother: आफ्रिकेतील सर्वात वयोवृद्ध 'आई'; युगांडाच्या महिलेने वयाच्या 70 व्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म

Oldest Mother Of Africa Gave Birth to Twins: असे म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही आणि जिथे देव असू शकत नाही तिथे त्याने आई निर्माण केली आहे.

Manish Jadhav

Oldest Mother Of Africa Gave Birth to Twins: असे म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही आणि जिथे देव असू शकत नाही तिथे त्याने आई निर्माण केली आहे. मुलाला जन्म देणे आणि जीवनचक्र चालू ठेवणे ही आईची सर्वात मोठी जबाबदारी असते. दरम्यान, काही स्त्रिया अशा असतात ज्यांना आई होण्याचा आनंद मिळत नाही, पण जेव्हा आई होण्याचा आनंद मिळतो, तेव्हा तो गगनात मावत नाही. असाच काहीसा प्रकार युगांडामध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत घडला, जिने वयाच्या 70 व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आणि आफ्रिकेतील सर्वात वयोवृद्ध आई बनली.

दरम्यान, जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या महिलेचे नाव सफिना नामुकवेया असून ती दोन मुलांना जन्म दिल्यानंतर निरोगी आहे. गुरुवारी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. मुलं जन्माला आल्यावर कुटुंबीयांनी राजधानी कंपाला येथील रुग्णालयात मिठाईचे वाटप केले आणि हा आनंद दिल्याबद्दल डॉक्टर आणि परिचारिकांचे आभार मानले. गरोदरपणापासून ते प्रसूतीपर्यंत सफिनाची काळजी घेणारे डॉ. एडवर्ड तामाले साली यांनी एएफपीला सांगितले की, हा सगळा एक विलक्षण अनुभव होता. IVF तंत्रामुळे हे शक्य झाले आहे, जे तिने स्वेच्छेने घेतले कारण तिला आई होण्याचा आनंद अनुभवायचा होता. लोक तिला वांझ म्हणत टोमणे मारत असत, पण तिने मुलांना जन्म देऊन लोकांना चोख प्रत्युत्तर दिले.

मुलांना जन्म दिला, प्रियकर भेटायला आला नाही

सफीनाने सांगितले की, 1992 मध्ये तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता, त्यामुळे तिला मूल होत नव्हते. यानंतर तिला जोडीदार मिळाला नाही आणि त्यासाठी प्रयत्नही केले नाहीत. आता अचानक तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आली आणि तिच्या मनात पुन्हा आई होण्याची इच्छा निर्माण झाली, पण म्हातारपणामुळे ती घाबरली. तरीही तिने डॉक्टरांशी संपर्क साधला आणि IVF बद्दल माहिती मिळाली. धोका पत्करुन तिने उपचार घेण्यास होकार दिला. डॉक्टरांनीही सहकार्य केले आणि गर्भधारणा सुरु झाली, जी डॉक्टर आणि परिचारिकांमुळे शेवटपर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाली, परंतु दुर्दैवाने मुलांना जन्म दिल्यानंतर प्रियकर तिला भेटायला आला नाही. सफिना पुढे म्हणाली की, कदाचित त्याला जुळ्या मुलांना जन्म दिल्याचा आनंद झाला नसेल, परंतु मला आई झाल्याचा खूप आनंद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT