North Koreas Intercontinental Missile Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea Weapon Testing: अमेरिकेला इशारा देत, उत्तर कोरियाने पुन्हा डागले सॉलिड-फ्यूल क्षेपणास्त्र

South Korea: प्रक्षेपणाची पुष्टी करून, दक्षिण कोरियाच्या सैन्याने बुधवारी सांगितले. प्रत्युत्तर म्हणून, आम्ही अमेरिकेशी सुरक्षा सहकार्य वाढवले ​​आहे.

Ashutosh Masgaunde

North Koreas Intercontinental Missile: उत्तर कोरियाने गुरुवारी आपल्या नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचे सांगितले.

नव्या प्रकारचे Hwasong-18, सॉलिड-फ्यूल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, उत्तर कोरियाने एप्रिलच्या सुरुवातीलाच एकदाच डागला होता, अशी माहिती राज्य वृत्तसंस्था KCNA ने दिली. क्षेपणास्त्राने 1,001 किमी उंचीवर उड्डाण केले.

तज्ञांनी सांगितले की सुमारे 70 मिनिटांची उड्डाण वेळ उत्तर कोरियाच्या मागील काही ICBM लाँच सारखीच आहे. या प्रक्षेपणाची जबाबदारी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी पार पाडली, असे KCNA ने म्हटले आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाने आमच्या बाबतची आपली धोरणे बदलल्याशिवाय, ही लष्करी आक्रमणे सुरूच राहतील, असे किम यांनी वचन दिले असल्याचे केसीएनएने म्हटले आहे.

प्रक्षेपणाची पुष्टी करून, दक्षिण कोरियाच्या सैन्याने बुधवारी सांगितले. प्रत्युत्तरात, आम्ही अमेरिकेशी सुरक्षा सहकार्य वाढवले ​​आहे.

दक्षिण कोरियाच्या सैन्याने म्हटले आहे की "प्रक्षेपण हा कोरियन द्वीपकल्पातील शांतता आणि सुरक्षेला हानी पोहोचवणारा एक गंभीर चिथावणीखोर प्रकार आहे" हा प्रकार संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांचे उल्लंघन करणारा आहे.

संयुक्त राष्ट्र संघ, अमेरिका आणि फ्रान्ससह त्याच्या मित्र राष्ट्रांनी याचा तीव्र निषेध केला. "हे प्रक्षेपण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनेक ठरावांचे स्पष्ट उल्लंघन आहे. यामुळे अनावश्यकपणे तणाव वाढत आहे.

आणि या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती अस्थिर करण्याचा धोका आहे," असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते अॅडम हॉज यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेच्या विमानावर हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचा आरोप

उत्तर कोरियाने सोमवारी अमेरिकेच्या गुप्तचर विमानाने त्याच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी कोरियन द्वीपकल्पाजवळ आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडी तैनात करण्याच्या अमेरिकेच्या योजनेचा निषेध म्हणून बुधवारी सॉलिड-फ्यूल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण झाले.

उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या महिन्यात सलग आठ दिवसांच्या चिथावणीखोर गुप्तचर विमानांच्या उड्डाणांचा दाखला दिला आहे. तसेच अमेरिकेच्या युद्धपातळीच्या पलीकडे हेरगिरी प्रकरा वाढवले ​​आहेत, असे म्हटले.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संरक्षण सहकार्य वाढवले

अमेरिकेने एप्रिलमध्ये म्हटले होते की त्यांची एक अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक पाणबुडी दशकांनंतर प्रथमच दक्षिण कोरियाच्या बंदरात भेट देईल.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी प्रगत स्टेल्थ जेट आणि लांब पल्ल्याच्या जड बॉम्बरसह संयुक्त लष्करी सराव आयोजित करून प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेसोबत संरक्षण सहकार्य वाढवले ​​आहे.

यून या आठवड्यात लिथुआनियामध्ये नाटो शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत, ज्याने उत्तर कोरियाकडून वाढत्या धोक्यांवर सहकार्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT