Missiles Dainik Gomantak
ग्लोबल

उत्तर कोरियाने पुन्हा लॉन्च केले क्षेपणास्त्र, दक्षिण कोरियाने दिला इशारा

दक्षिण कोरियाच्या सरकारने म्हटले की उत्तर कोरियाने बुधवारी तीन क्षेपणास्त्रे लॉन्च केली आहेत.

दैनिक गोमन्तक

दक्षिण कोरियाच्या (South Korea) सरकारने म्हटले आहे की उत्तर कोरियाने बुधवारी तीन क्षेपणास्त्रे लॉन्च केली आहेत. त्यातील एक संशयित आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र होते. दक्षिण कोरिया सरककारचे म्हणणे आहे की, ह्या क्षेपणास्त्रांच्या लॉचिंग मुळे तुम्ही चेतावणी देत आहात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता भंग होत आहे. ह्या बरोबरच दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे की, हे असेच चालू राहिले तर, उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडावे लागेल. (North Korea launches missile South Korea warns)

उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा उद्देश अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता संपादन करणे आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने याआधी सांगितले की, उत्तर कोरियाने उत्तरेकडील पूर्व किनारपट्टीवर तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे लॉन्च केली आहेत. उत्तर कोरियाने जवळपास दोन आठवड्यांनंतर पुन्हा एकदा शस्त्रास्त्र प्रक्षेपण सुरू केले आहे.

उत्तर कोरियाची ही 18वी क्षेपणास्त्र चाचणी,

या वर्षाचेच बोलायचे झाले तर उत्तर कोरियाची ही 18वी क्षेपणास्त्र चाचणी आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या प्रमुखांनी सांगितले आहे की, त्यांच्या शेजारील देशाने पूर्व किनारपट्टीपासून समुद्रात क्षेपणास्त्र लॉन्च केले आहे. त्यांनी सांगितले आहे की, सिन्पो शहराच्या पूर्वेकडील बंदराजवळील समुद्रातून ही चाचणी घेण्यात आली आहे, जिथे उत्तर कोरियाकडे मोठ्या शिपयार्ड बिल्डिंग पाणबुड्या देखील आहेत. मात्र, हे क्षेपणास्त्र किती अंतरावर पडले आहे हे त्यांनी अध्याप सांगितले नाहीये.

जपानच्या संरक्षण मंत्रालयानेही दुजोरा दिला

जपानच्या संरक्षण मंत्रालयानेही उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीला दुजोरा दिलेला आहे. मात्र, जपानकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी अधिकाऱ्यांना कोणत्याही अनुचित घटनेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे, यासोबतच त्यांनी विमाने आणि जहाजे सुरक्षित ठेवण्याचे देखील आदेश दिले आहेत.

किम जोंगने जगाला दाखवली विनाशकारी क्षेपणास्त्रे

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन (Kim Jong-un) यांनी प्योंगयांगमध्ये एका विशाल लष्करी परेडमध्ये यावेळी भाषण केले होते. जोंग यांनी अण्वस्त्रांच्या विकासाला गती देण्याचा संकल्प केल्याचे व्यक्त केले आहे. कोणत्याही देशाच्या उक्सवण्यावरून आपण अण्वस्त्रे वापरण्यावरून हटणार नाहीये, असे त्यांनी म्हटले होते. अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी आणि निर्बंधांमध्ये सवलत मिळवण्यासाठी उत्तर कोरिया सातत्याने शस्त्रास्त्रांची चाचणी करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT