Texas School Shooting: 18 वर्षीय तरुणाकडून 21 जणांवर अंधाधुंद गोळीबार

अमेरिकेतील टेक्सासमधील एका शाळेत मंगळवारी 24 मे रोजी दुपारी अंदाधुंद गोळीबार झाला.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील (America) टेक्सासमधील एका शाळेत मंगळवारी 24 मे रोजी दुपारी अंदाधुंद गोळीबार झाला. युवल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये 18 वर्षीय तरुणाने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात 13 मुले, शाळेचे कर्मचारी आणि काही पोलीस जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा देखील जाहीर केला आहे. हल्लेखोर मारल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे. त्याच्या ओळखीबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाहीये. (Texas School Shooting 18 year old indiscriminately fires at 21 people)

Joe Biden
''गहू निर्यात बंदीवर पुनर्विचार करण्यासाठी भारताला विनंती करणार'': IMF प्रमुख

जो बायडेन यांनी व्यक्त केले दु:ख

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) म्हणाले की, रॉब एलिमेंटरी शाळेमध्ये घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. राष्ट्राला संबोधित करताना बायडेन पुढे म्हणाले की, 'आता कृती करण्याची वेळ आली आहे. जे कॉमन सेन्स गन कायद्याला वेळ लावतात किंवा त्यामध्ये अडथळा आणतात त्यांना हे सांगणे आवश्यक आहे. आम्ही त्यांना विसरणार नाहीये. या दुःखात विचारात बेडवर झोपून विचारात पडलेल्या माता पित्यांच्या सोबत आमची प्रार्थना आहे.

बायडेन यांनी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले की, एक देश म्हणून आपल्याला विचारायचे आहे की देवाच्या नावाने आपण बंदुकीच्या लॉबीसमोर कधी उभे राहू आणि त्या वेळी आपण काय करणे आवश्यक आहे. पालक त्यांच्या मुलांना पुन्हा कधीही पाहू शकणार नाहीत. ही घटना म्हणचे आत्मा फाडण्यासारखे आहे.

रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्यांच्या सन्मानार्थ बायडेन यांनी 28 मे रोजी सर्व लष्करी आणि नौदल जहाजे, स्थानके तसेच परदेशातील सर्व यूएस दूतावास आणि इतर कार्यालयांमध्ये सूर्यास्ताच्या वेळी अर्धा झेंडा फडकवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांच्याशी शाळेतील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना मदत केली जाऊ शकते. त्याच वेळी, टेक्सास शाळेतील गोळीबारानंतर उपाध्यक्ष कमला हॅरिस म्हणाल्या की, "आता पुरे झाले... आपल्यात कृती करण्याचे धैर्य असायला हवे".

Joe Biden
पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची घोषणा, 2023 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार QUAD बैठक

आतापर्यंतचा सर्वात भयानक गोळीबार

टेक्सासच्या इतिहासातील हा सर्वात भयानक गोळीबार होता. टेक्सासच्या उवाल्डे शहरातील या शाळेमध्ये 600 मुले शिकतात. शाळेत घुसून 18 वर्षीय मुलाने अंदाधुंद गोळीबार केला, हल्लेखोराने दुसरी, तिसरी आणि चौथी इयत्तेत शिकणाऱ्या निष्पाप मुलांना टारगेट केले.

हल्लेखोराने त्याच्या आजीलाही गोळ्या घातल्या.

गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले की, संशयिताचे नाव साल्वाडोर रामोस आहे तर तो युवाल्डे येथील रहिवासी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयिताने शाळेत गोळीबार करण्यापूर्वी त्याच्या आजीलाही गोळ्या झाडल्या आहेत. तिच्या आजीला एअरलिफ्ट करण्यात आले आहे, ती सध्या जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे

टेक्सासच्या घटनेनंतर एका तरुणाचा फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. तर हे इंस्टाग्राम पेज साल्वाडोर रामोसचे सांगितले जात आहे. यावर एका तरुणाचा मोबाईलसोबतचा फोटो देखील आहे. याशिवाय त्या पेजवर रायफलचे फोटोही टाकण्यात आले आहेत. हा टेक्सास गोळीबारातील संशयित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप या फोटोंना अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. हे इंस्टाग्राम पेजही शूटिंगनंतर काही वेळातच काढून टाकले गेले.

टेक्सासच्या शाळेत गोळीबाराची ही घटना 2012 मध्ये कनेक्टिकटमध्ये झालेल्या गोळीबाराशी मिळतीजुळती असल्याचे सांगण्यात येत आहे. 14 डिसेंबर 2012 रोजी कनेक्टिकटमधील न्यूटाऊन येथील सॅंडी हूक एलिमेंटरी हायस्कूलमध्ये एका 20 वर्षीय व्यक्तीने गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यात 20 मुले होती, तर अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात भीषण सामूहिक गोळीबार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com