Cruise Missiles Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea पुन्हा चवताळला, पाणबुडीवरुन डागली 2 क्रूझ क्षेपणास्त्रे; अमेरिका-दक्षिण कोरिया...

North Korea: अमेरिकेसह अनेक देशांनी इशारे देऊनही उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांची चाचणी सुरुच ठेवली आहे.

Manish Jadhav

North Korea: अमेरिकेसह अनेक देशांनी इशारे देऊनही उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांची चाचणी सुरुच ठेवली आहे. आता उत्तर कोरियाने रविवारी पाणबुडीवरुन दोन रणनीतिक क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर संयुक्त लष्करी सराव सुरु होण्याच्या एक दिवस आधी उत्तर कोरियाने ही चाचणी केली.

8.24 Yonggang वरुन क्षेपणास्त्रे डागण्यात आली

कोरियाच्या वृत्तसंस्थेने सांगितले की, रविवारी अंडरवाटर लॉन्चिंग ड्रिलमध्ये पूर्व समुद्रातील क्योंगफो खाडीच्या पाण्यात 8.24 योंगगांगवरुन क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

एजन्सीने सोमवारी सांगितले की, या दोन्ही क्षेपणास्त्रांची चाचणी शस्त्र प्रणालीच्या विश्वासार्हतेची पुष्टी करण्यासाठी करण्यात आली.

उत्तर कोरियाच्या (North Korea) क्षेपणास्त्र चाचणीतून अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करी सैन्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा निर्धार दिसून येतो.

क्रूझ क्षेपणास्त्रांना शक्ती देणारी

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने असेही सूचित केले की, उत्तर कोरियाने अण्वस्त्रांनी चाचणी केलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रांना सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्रांनी दोन तासांहून अधिक काळ उड्डाण केले.

लष्कर हाय अलर्टवर : दक्षिण कोरिया

दरम्यान, दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने सांगितले की, ताज्या चाचणीनंतर लष्कर हाय अलर्टवर आहे. देशाची गुप्तचर संस्था अमेरिकेच्या (America) मदतीने या प्रक्षेपणाची खासियत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

13 ते 23 मार्च दरम्यान लष्करी सराव

विशेष म्हणजे, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात 13 ते 23 मार्च दरम्यान लष्करी सराव होणार आहे. उत्तर कोरियाने या सरावाचा निषेध केला असून याला आक्रमक युद्धाची तयारी असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT