North Korea President of Kim Jong Un Dainik Gomantak
ग्लोबल

उत्तर कोरिया पुन्हा आक्रमक; वाढवतोय आपली अणुउर्जा शक्ती

अमेरिकेबरोबर (America) दीर्घकाळ चालणाऱ्या निष्क्रिय अण्वस्त्र धोरणादरम्यान उत्तर कोरियाने (North Korea) पुन्हा एकदा आपली आण्विक शक्ती वाढवण्यासंबंधी धमकी दिली होती.

दैनिक गोमन्तक

उत्तर कोरियाचा अध्यक्ष किम जोंग उन (Kim Jong Un) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आताही पुन्हा एकदा आण्विक कार्यक्रमामुळे उत्तर कोरिया जगातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. संयुक्त राष्ट्र अणुसंस्थेने (IAEA) म्हटले आहे की, उत्तर कोरियाने आपल्या मुख्य अणुभट्टीचे काम पुन्हा एकदा सुरु केले आहे. अमेरिकेबरोबर दीर्घकाळ चालणाऱ्या निष्क्रिय अण्वस्त्र धोरणादरम्यान उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आपली आण्विक शक्ती वाढवण्यासंबंधी धमकी दिली होती. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा वार्षिक अहवाल प्योंगयांगच्या उत्तरेस योंगब्यॉनमधील उत्तर कोरियाच्या मुख्य अणुसंकुलात 5 मेगावॅटच्या अणुभट्टीशी संबंधित आहे. ही अणुभट्टी रिएक्टर प्लूटोनियम तयार करते, जे समृद्ध युरेनियमसह अणू शस्त्रे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मुख्य घटकांपैकी एक आहेत.

IAEA च्या अहवालानुसार, जुलै 2021 च्या सुरुवातीपासून अणुभट्टीच्या ऑपरेशनने थंड पाण्याचा स्त्राव करण्यासह अनेक संकेत दिले आहेत. या अहवालात असेही म्हटले की, फेब्रुवारीच्या मध्यापासून ते यावर्षी जुलैच्या सुरुवातीपर्यंत, योंगबायनची रेडिओकेमिकल लॅब कार्यरत असल्याचे संकेत मिळाले आहेत. उत्तर कोरियाच्या अणुभट्टीतून बाहेर पडणाऱ्या इरॅडिएटेड इंधनाची चिन्हे मागील मोहिमांप्रमाणेच असल्याचेही अहवालात म्हटले आहे. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या रॉड्सची पुन:प्रक्रिया करुन प्लूटोनियम काढला जातो.

संयुक्त राष्ट्र तणावग्रस्त

आयएईएने म्हटले आहे की, उत्तर कोरियाचे अण्वस्त्र कार्यकक्रम गंभीर चिंतेचे कारण बनत आहे. याव्यतिरिक्त, 5-मेगावॅट अणुभट्टी आणि रेडिओकेमिकल लॅबच्या ऑपरेशनचे नवीन संकेत अधिक त्रासदायक आहेत. आयएईएला सध्या योंगब्यॉन आणि उत्तर कोरियामध्ये अन्यत्र प्रवेश नाही, कारण 2009 मध्ये देशातील आयएईए निरीक्षकांना हद्दपार करण्यात आले होते. एजन्सीने उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि मुक्त स्त्रोत माहिती वापरल्याचे सांगितले आहे.

उत्तर कोरिया आण्विक कार्यक्रमाला "हृदय" संबोधतो

योंगब्यॉन कॉम्प्लेक्स अत्यंत समृद्ध युरेनियम आणि इतर प्रमुख आण्विक इंधन देखील तयार करते. आयएईएच्या अहवालात म्हटले आहे की, काही काळ येथे प्रयोगशाळा कार्यरत नसल्याचे संकेत मिळत होते, जरी नियमित वाहनांची हालचाल दिसून आली. उत्तर कोरिया या संकुलाला त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे "हृदय" असा संबोधतो. हे अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेचे कारण आहे. योंगब्योन येथे किती शस्त्रास्त्र-श्रेणीचे प्लूटोनियम किंवा अत्यंत समृद्ध युरेनियम तयार केले गेले हे स्पष्ट नाही.

किम जोंग उन यांनी ट्रम्प यांना हा प्रस्ताव दिला

2019 च्या सुरुवातीला, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या शिखर परिषदेदरम्यान व्यापक निर्बंधातून सूट मिळविण्यासाठी संपूर्ण परिसर नष्ट करण्याची ऑफर दिली होती, परंतु अमेरिकन लोकांनी किमची ऑफर नाकारली होती. 2018 मध्ये दक्षिण कोरियाच्या अंदाजानुसार, उत्तर कोरियाने आधीच 20 ते 60 अण्वस्त्रे बनवली असतील. उत्तर कोरियाने अलिकडच्या काही महिन्यांत इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने उत्तर कोरियाबरोबर असणारी शत्रूपूर्ण निती मागे घेतली नाही तर, आपला अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरु करेल असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT