Nobel Peace Prize 2025: जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि बहुचर्चित नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी (10 ऑक्टोबर) नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे झाली. या घोषणेमुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. यावर्षीचा 'नोबेल पीस प्राइज' व्हेनेझुएलाच्या (Venezuela) प्रमुख विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचादो (María Corina Machado) यांना प्रदान करण्यात आला.
नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून खूप उत्सुक आणि बेचैन दिसत होते. त्यांनी आपल्या काही परराष्ट्र धोरणांमधील यश, विशेषतः शांतता करार घडवून आणल्याबद्दल स्वतःची जाहीरपणे प्रशंसा केली होती. त्यामुळे ते या पुरस्काराच्या यादीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
नोबेल तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांना पुरस्कार मिळण्याची शक्यता अतिशय कमी होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नॉर्वेजियन नोबेल समिती (Norwegian Nobel Committee) दरवर्षी अशा व्यक्ती किंवा संस्थांची निवड करते, ज्यांनी शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी, देशांमधील बंधुत्व मजबूत करण्यासाठी आणि समाजासाठी काम करण्यासाठी दीर्घकाळ योगदान दिले आहे.
हा पुरस्कार नेहमीच अनपेक्षितपणे जाहीर होत असल्याने तो चर्चेचा विषय ठरतो. यावर्षी मारिया कोरिना मचादो यांची निवड करुन नोबेल समितीने व्हेनेझुएलातील लोकशाही आणि शांततेसाठी सुरु असलेल्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा दर्शवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.