Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांच्याविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव, 'पंजाबचे मुख्यमंत्री' ही अडचणीत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची हकालपट्टी करण्यासाठी संसदेत आज अविश्वास ठराव मांडण्यात आला.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची हकालपट्टी करण्यासाठी संसदेत आज अविश्वास ठराव मांडण्यात आला. या प्रस्तावावर आता सभागृहात चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी हा प्रस्ताव मांडला. मुदत संपल्यानंतर तीन दिवसांनी 25 मार्च रोजी अधिवेशन बोलावण्यात आले होते. परंतु सभापतींनी नियमांचे कारण देत हा प्रस्ताव संसदेच्या पटलावर ठेवण्यास नकार दिला. (No-confidence motion against Prime Minister Imran Khan in Parliament Punjab Chief Minister in trouble)

दरम्यान, 8 मार्च रोजी इम्रान खान सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे पाकिस्तानचं राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. त्याचाच परिणाम पुढील आठवड्याच्या अखेरीस दिसून येईल. इम्रान खान यांचे सरकार पाडण्यासाठी 342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधकांना 172 मतांची गरज असणार आहे.

त्याच वेळी, पाकिस्तानमधील विरोधी पक्षाने सोमवारी पंतप्रधान इम्रान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानचे पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर विरोधकांनी हे पाऊल उचलले होते.

त्याच वेळी, पाकिस्तानमधील विरोधी पक्षाने सोमवारी पंतप्रधान इम्रान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानचे पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री उस्मान बुजदार (Usman Bujdar) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. काही आठवड्यांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर विरोधकांनी हे पाऊल उचलले होते.

8 मार्च रोजी विरोधी पक्षांनी पाकिस्तानी संसदेच्या (National Assembly) सचिवालयासमोर पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. देशातील वाढती महागाई आणि आर्थिक संकटाला इम्रान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. पंतप्रधानांना हटवल्यास पंजाब विधानसभा विसर्जित करण्याची पीटीआय सरकारची संभाव्य योजना हाणून पाडण्यासाठी बुझदार यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव घाईघाईने आणण्यात आला आहे.

तसेच, विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांनी 52 वर्षीय बुझदार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला ज्यावर 127 आमदारांच्या सह्या आहेत. अविश्वास ठराव सभागृहात मांडता यावा यासाठी विरोधकांनी अर्ज सादर करुन विधानसभेचे अधिवेशन घेण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री बुजदार यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याचे अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे. अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर पीएमएल-एनचे आमदार राणा मशहूद म्हणाले की, 'विरोधक नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर आणि सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांच्याविरोधातही अविश्वास प्रस्ताव आणतील.'

राणा म्हणाले की, 'इम्रान आणि बुजदार अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाऊ शकणार नाहीत हे स्पष्टपणे दिसत आहे.'

शिवाय, पंजाब विधानसभेत 10 जागा असलेल्या पीएमएल-क्यू हा सरकारचा मित्रपक्ष आहे. परंतु त्यांनीही विरोधकांशी हातमिळवणी करण्याची हमी भरली आहे. पीएमएल-क्यूने म्हटले आहे की, 'इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT