Nirav Modi Dainik Gomantak
ग्लोबल

Nirav Modi Extradition: नीरव मोदीला न्यायालयाचा मोठा झटका, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

Nirav Modi Extradition: भारतातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीचे ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाविरुद्धचे अखेरचे अपील गुरुवारी (15 डिसेंबर) फेटाळण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Nirav Modi Extradition: भारतातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीचे ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाविरुद्धचे अखेरचे अपील गुरुवारी (15 डिसेंबर) फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप उघडकीस आल्यानंतर नीरव मोदीने 2018 मध्ये भारतातून पलायन केले होते.

दरम्यान, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली भारतात खटल्याला सामोरे जायचे असलेल्या नीरव मोदीला त्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशाविरुद्ध यूके सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास लंडनच्या उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. प्रत्यार्पण केल्यास आत्महत्येचा धोका असल्याचा युक्तिवाद आरोपीने केला आहे. मात्र, नीरव मोदीचे अपील उच्च न्यायालयात (High Court) फेटाळण्यात आले.

उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला

लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुनावलेल्या निकालात, लॉर्ड जस्टिस जेरेमी स्टुअर्ट-स्मिथ आणि न्यायमूर्ती रॉबर्ट जे म्हणाले की, 'अपीलकर्त्याचा (नीरव मोदी) सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी रजेचा अर्ज नाकारण्यात आला आहे.' नीरव मोदी सध्या लंडनच्या (London) वँड्सवर्थ तुरुंगात आहे. हे अपील फेटाळल्यानंतर आता आरोपीकडे प्रत्यार्पणाविरुद्ध यूकेमध्ये कोणताही कायदेशीर पर्याय उरला नाही.

बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर भारतातून पळून गेला

गेल्या महिन्यात नीरव मोदीने ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात भारताच्या प्रत्यार्पणाविरुद्ध अपील करण्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मानसिक आरोग्याच्या कारणास्तव प्रत्यार्पणाविरुद्ध 51 वर्षीय नीरव मोदीचे अपील फेटाळल्यानंतर हा अर्ज आला आहे. आरोपीचा आत्महत्येचा धोका असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा उघड झाल्यानंतर नीरव मोदी भारतातून पळून गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT