'Nijjar was not a saint, Canada's media rapped their own Prime Minister Justin Trudeau. Dainik Gomantak
ग्लोबल

India-Canada: '...तर मोदी सरकार गप्प बसणार नाही', कॅनडाच्या मीडियाने त्यांच्याच पंतप्रधानांना झापले

Justin Trudeau: खलिस्तान टायगर फोर्स (KTF) दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा विश्वासार्ह पुरावा कॅनडाने अद्याप दिलेला नाही.

Ashutosh Masgaunde

'Nijjar was not a saint, Modi government will not remain silent Canada's media rapped their own Prime Minister Justin Trudeau:

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणाचा मुद्दा भारत आणि कॅनडा यांच्यात चांगलाच तापला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचे एजंट सामील असल्याचा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे.

यावर कनडाच्या प्रसार माध्यमांनी त्यांच्या पंतप्रधानांना चांगलेच झापले आहे. भारताविरोधातील हे पुराव सिद्ध नाही झाले तर मोदी सरकार गप्प बसणार नाही, असे मत त्यांनी मांडले आहे.

ट्रूडो बॅकफूटवर

ट्रूडो यांनी अशा वेळी हे आरोप केले आहेत जेव्हा देशांतर्गत मुद्द्यांवरून त्यांना ते बॅकफूटवर जात आहेत. आणि निवडणुकीच्या दृष्टीनेही ते त्यांच्या विरोधकांपेक्षा सतत मागे पडत आहेत.

कॅनडाच्या प्रसारमाध्यमांमध्ये असे बोलले जात आहे की, देशात झपाट्याने कमी होत असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. आणि जर ते हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांना देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर मोठ्या बदनामीला सामोरे जावे लागेल.

'...तर मोठी बदनामी होईल'

कॅनेडियन मीडियाचा एक मोठा वर्ग असे म्हणत आहे की, ट्रूडो यांनी आपल्या घसरत्या लोकप्रीयतेचा देशांतर्गत राजकारणात उपयोग करण्यासाठी घाई केली आहे.

कॅनडातील प्रमुख वृत्तपत्र नॅशनल पोस्टने आपल्या एका संपादकीयमध्ये लिहिले आहे की, 'ट्रूडो यांनी केलेले आरोप अद्याप सिद्ध होणे बाकी आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते आतापर्यंत कॅनडातील लोकांना कोणताही पुरावा दाखवण्यात यशस्वी ठरलेले नाहीत.

नॅशनल पोस्टने पुढे लिहिले आहे की, 'जर ट्रुडो यांनी हे वादळ कोणत्याही पुराव्याशिवाय निर्माण केल्याचे समोर आले, तर ते देशांतर्गत आणि जागतिक प्रभावाची बाब असेल.'

नॅशनल पोस्टने अँगस रीड इन्स्टिट्यूटच्या नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला दिला ज्यामध्ये ट्रूडो यांना केवळ 33% मान्यता रेटिंग मिळाली तर 63% लोकांनी त्यांना नापसंत केले आहे.

ट्रुडो यांचे सरकार सध्या २४ खासदार असलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाच्या पाठिंब्याने सत्तेत आहे. या पक्षाचे प्रमुख जगमीत सिंग हे खलिस्तानचे समर्थन करणारे मानले जातात.

'भारत गप्प बसणार नाही'

कॅनडाच्या टोरंटो सनमधील एका लेखात म्हटले आहे की, कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांबाबत भारत गप्प बसणार नाही.

कॅनडवासीयांनी आता मोदी सरकारकडून एवढीच अपेक्षा केली पाहिजे की भारत या आरोपासाठी कॅनडाला शिक्षा देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे, निज्जर यांच्या हत्येशी भारत सरकारचा संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी ट्रूडो सरकारने जे काही पुरावे सादर करता येतील ते जाहीर करणे महत्त्वाचे आहे.

'निज्जर संत नव्हता'

टोरंटो सनने या लेखात पुढे असे लिहिले आहे की, हरदीपसिंग निज्जर यांच्याबद्दल स्पष्ट बोलणे आवश्यक आहे की, तो संत नव्हता. त्याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असेल आणि ट्रूडो सरकार अजूनही आपल्या शब्दावर ठाम असेल, तर भारताला जबाबदार धरले पाहिजे.

वृत्तपत्राने लिहिले आहे की, जर मोदी सरकारकडे निज्जरला गुन्ह्यांशी जोडणारे पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे कॅनडाच्या न्यायालयात सादर केले पाहिजेत आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर कारवाईला सामोरे जायला पाहिजे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT