Neymar Jr Donation Dainik Gomantak
ग्लोबल

Neymar Jr Donation: नेमारकडून माणुसकीचा 'गोल्डन गोल'! व्हेनेझुएलातील भूकंपग्रस्तांसाठी 2.5 लाख डॉलर्सची मदत; चाहत्यांचं जिंकलं मन

Neymar Donation Venezuela Relief Fund: व्हेनेझुएलातील जनतेसोबत आपल्या संवेदना असल्याचे सांगत नेमारने या कठीण काळात या मदतीमुळे बाधित कुटुंबांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

Manish Jadhav

Neymar Donation Venezuela Relief Fund: ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याने विनाशकारी भूकंपाचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलातील आपत्कालीन बचावकार्य आणि मानवतावादी मदतकार्यासाठी 2,50,000 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त) दिले. व्हेनेझुएलातील 'एल सुमारिओ'च्या रिपोर्टनुसार, या निधीचा वापर भूकंपग्रस्तांना अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय पुरवठा आणि तात्पुरते निवारे यांसारखी तातडीची मदत देण्यासाठी केला जाईल. व्हेनेझुएलातील जनतेसोबत आपल्या संवेदना असल्याचे सांगत नेमारने या कठीण काळात या मदतीमुळे बाधित कुटुंबांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

'सीएनएन'ने व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिगेज यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी आलेल्या दोन लागोपाठच्या विनाशकारी भूकंपात मृतांची संख्या तब्बल 1430 वर पोहोचली. या आपत्तीत 3238 लोक जखमी झाले असून 3142 कुटुंबे बेघर झाली आहेत. 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या या भूकंपांनंतरही तिथे सातत्याने आफ्टरशॉक्स बसत आहेत. अवजड उपकरणांची टंचाई आणि या सततच्या धक्क्यांमुळे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत.

दुसरीकडे, ब्राझीलच्या (Brazil) फुटबॉल चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. ब्राझीलचे मुख्य प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी सांगितले की, स्टार फॉरवर्ड नेमारच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली. जपानविरुद्धच्या फिफा क्लब विश्वचषक राउंड ऑफ 32च्या सामन्यापूर्वी नेमार आता खेळण्यासाठी सज्ज झाला. 34 वर्षीय नेमार दुखापतीमुळे विश्वचषकातील पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता, मात्र स्कॉटलंडविरुद्धच्या 3-0 अशा विजयात तो शेवटच्या काही मिनिटांत मैदानात उतरला होता.

प्रशिक्षकांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, गेल्या आठवड्यात नेमारच्या रिकव्हरीमध्ये मोठी प्रगती दिसली. यापूर्वी तो 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ खेळू शकत नव्हता, पण आता त्याची प्रकृती उत्तम असून तो जास्त वेळ मैदानात खेळू शकेल. दरम्यान, ब्राझील संघाने ग्रुप 'सी' मध्ये अव्वल स्थान पटकावत इतिहास रचला. 1982 पासून सलग 12व्या वेळेस विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमध्ये अव्वल राहण्याचा आपला 44 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड ब्राझीलने कायम राखला. नेमारचे पुन्हा मैदानात परतणे आणि त्याचे हे सामाजिक कार्य सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT