US Former President Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

न्यूयॉर्क कोर्टाचा ट्रम्प तात्यांना आदेश, दररोज भरा 10,000 डॉलरचा दंड

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US Former President Donald Trump) यांना न्यूयॉर्क कोर्टाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US Former President Donald Trump) यांना न्यूयॉर्क कोर्टाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. व्यावसायिक व्यवहाराच्या तपासाचा भाग म्हणून न्यूयॉर्कच्या (New York) अ‍ॅटर्नी जनरलने जारी केलेल्या समन्सला उत्तर देण्यात अपयशी ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायाधीश आर्थर एन्गोरॉन (State Judge Arthur Engoron) यांनी ट्रम्प यांना प्रतिदिन 10,000 डॉलरचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. "मिस्टर ट्रम्प, मला माहित आहे की, तुम्ही तुमच्या व्यवसायबद्दल जेवढे कटीबध्द आहात तेवढाच मी माझ्या कामाबद्दल कटीबध्द आहे," एंगोरॉन खंडपीठाने निकाल देण्यापूर्वी मॅनहॅटन कोर्टरुममध्ये म्हणाले.

दरम्यान, न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी निकाल दिला असून ट्रम्प यांना मंगळवारपासून दंड ठोठावण्यास सुरुवात झाली आहे. अ‍ॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांना 2019 च्या चौकशीमध्ये ट्रम्प यांच्या मालमत्तेच्या (Property) कागदपत्रांची तपासणी करायची होती. आपल्या लेखी आदेशात, एन्गोरॉन म्हणाले की, ''जेम्स यांच्या कार्यालयाने सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी न्यायालयाच्या (Court) आदेशाची अवज्ञा केली आहे. त्यामुळे माजी अध्यक्षांना दररोज दंड आकारला जाईल.'' भविष्यात अशीच दिरंगाई केल्यास महाधिवक्ता कार्यालय संबंधित कारणांवरुन त्यांच्यावर कारवाई करेल, असेही ते म्हणाले.

एन्गोरॉन पुढे म्हणाले की, तपासापूर्वीच पुरावे सापडले आहेत. ज्यामध्ये गोल्फ क्लब आणि पेंटहाऊस अपार्टमेंटसह इतर मालमत्तेचे योग्य मोल केले नसल्याचे आढळून आले आहे. ते म्हणाले, 'आदेश न पाळता प्रत्येक दिवस जात होता.' डोनाल्ड ट्रम्पबद्दल बोलायचे झाल्यास तर ते अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ अनेक वाद-विवादांनी भरलेला आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे. आपल्याविरुद्धचा तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच वेळी, अ‍ॅटर्नी जनरल लेटिया जेम्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT