Corona New Variant Dainik Gomantak
ग्लोबल

New Variant of Corona: क्रोनिक इन्फेक्शननंतर रुग्णामध्ये आढळला सर्वात उत्परिवर्तित कोविड प्रकार

Corona Variant: इंडोनेशियातील रूग्णाच्या स्वॅबमध्ये आढलेला कोविडचा हा व्हेरिएंट विषाणूची आतापर्यंतची सर्वात उत्परिवर्तित आवृत्ती असल्याचे मानले जाते.

Ashutosh Masgaunde

New Variant of Corona Found In Indonesia:

कोरोना महामारीतून जग सावरले आहे असे वाटत असातानाच इंडोनेशियामधून एक मोठी बातमी समोर आली आहे.

इंडोनेशियामध्ये आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा आतापर्यंत नोंदलेल्या व्हेरिएंटपैकी सर्वात उत्परिवर्तित व्हेरिएंटपैकी एक असू शकतो, असे निरिक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. विशेष म्हणजे, ओमिक्रॉनेक्षा भयानक व्हेरिएंट असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शास्त्रज्ञांनी सांगितले की, या नव्या संकटामुळे जगाला कोणत्याही प्रकारच्या लॉकडाउनची गरज भासणार नाही.

जुलैच्या सुरुवातीला जागतिक कोविड जीनोमिक्स डेटाबेसमध्ये सादर केलेला नवीन विषाणू, दीर्घकालीन संसर्गाच्या प्रकरणामुळे उद्भवला असल्याचे मानले जाते.

या व्हेरिएंटचे क्रॉनिक इन्फेक्शन सामान्यत: रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये आढळते. यामध्ये एड्सचे रुग्ण, कर्करोगासाठी केमोथेरपी उपचार घेत असलेले रुग्ण यांचा समावेश होतो.

वॉरविक विद्यापीठातील विषाणूशास्त्राचे प्रोफेसर लॉरेन्स यंग म्हणाले की, नव्याने शोधलेल्या या व्हेरिएंटमध्ये पुढे जाऊन इतरांना संसर्ग होण्याची शक्यता आहे की नाही हे अद्यार स्पष्ट झाले नाही.

कोरोना व्हेरिएंटचा हा प्रकार शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला चकमा देण्यास सक्षम असू शकतो.

कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने ब्रिटनसारख्या देशांनी अनुवांशिक विश्लेषणाचे प्रमाण कमी केले आहे.

प्रोफेसर यंग पुढे म्हणाले, 'हा विषाणू सतत आपले रुप बदलत सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. त्यामुळे सर्वांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

जसा विषाणू पसरत जातो तसे त्याचे उत्परिवर्तन होत राहते. त्यामुळे आधीचे काही आजार आसणाऱ्या रुग्णांना गंभीर संक्रमणाचा धोका आहे. असेही प्रोफेसर यंग म्हणाले.

सध्याचा हा व्हेरिएंट ज्या रुग्णाच्या नमुन्यातून सापडला आहे, त्यांचे सध्याचे आरोग्य, वय आणि लिंग याबाबतचे तपशील उघड करण्यात आले नाहीत.

मिसूरी विद्यापीठातील यूएस व्हायरोलॉजिस्ट मार्क जॉन्सन यांनी ऑनलाइन कोविड व्हेरिएंट ट्रॅकर द्वारे या व्हेरिएंटवर प्रकाश टाकण्यापूर्वी, रायन हिसनरने प्रथम या व्हेरिएंटबाबत खुलासा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT