Nepal Jeep Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

Nepal Jeep Accident 20 Dead: नेपाळमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका जीपचा भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

Nepal Jeep Accident 20 Dead: नेपाळमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका जीपचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रोल्पा जिल्ह्यातील थवांग ग्रामीण नगरपालिकेच्या जलजाला परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी तीर्थयात्रेसाठी निघाले होते. डोंगरदऱ्यांच्या वळणदार रस्त्यावरुन प्रवास करत असताना निसरड्या रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप थेट दरीत कोसळली.

अपघाताचे (Accident) मुख्य कारण पावसाळा आणि खराब रस्ते असल्याचे सांगितले जात आहे. परिसरात झालेल्या पावसामुळे डोंगराळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. चिखलावरुन चाक घसरल्याने जीप अनियंत्रित झाली आणि सुमारे 700 मीटर खोल दरीत कोसळली. दरीची खोली जास्त असल्याने जीपचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यातील 20 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. या भीषण अपघातामुळे संपूर्ण नेपाळमध्ये शोककळा पसरली.

नेपाळमध्ये (Nepal) रस्ते अपघातांची मालिका थांबताना दिसत नाहीये. याच दरम्यान अन्य एका घटनेचीही चर्चा होत आहे, जिथे 10 फेब्रुवारी रोजी मध्य नेपाळमध्ये एका बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता. ती बस काठमांडूून ओखलढुंगाकडे जात असताना बागमती प्रांतातील रामेछाप नगरपालिकेत तामाकोशी नदीत कोसळली होती. त्या अपघातात 8 जण जखमी झाले होते आणि पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले होते. मात्र, गुरुवारी झालेल्या या नव्या अपघाताने नेपाळमधील डोंगराळ भागातील प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या पोलीस मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम करत असून जखमींना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT