Gen Z Protest in Nepal Dainik Gomantak
ग्लोबल

Gen Z Protest in Nepal: सोशल मीडिया बॅनचा नेपाळला फटका, युवा पिढी आक्रमक; थेट संसदेत घुसुन तोडफोड Watch Video

Nepal Banned Social Media: नेपाळची राजधानी काठमांडू आणि इतर शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जनरल-झेड पिढी रस्त्यावर उतरून प्रचंड निदर्शने करत आहे.

Sameer Amunekar

नेपाळची राजधानी काठमांडू आणि इतर शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जनरल-झेड पिढी रस्त्यावर उतरून प्रचंड निदर्शने करत आहे. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपसह तब्बल २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे तरुणाई संतप्त झाली आहे. हजारो विद्यार्थी आणि युवक-युवती “जनरल-झेड रिव्होल्यूशन”च्या नावाखाली आंदोलन छेडत असून परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे.

काठमांडूमध्ये रविवारी निदर्शकांनी संसद भवन परिसरात प्रवेश केला. यावेळी मोठा गोंधळ उडाला. जमावाने पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडले. झाडांच्या फांद्या, पाण्याच्या बाटल्या फेकत निदर्शकांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. या दरम्यान संसद भवन संकुलात तोडफोड झाल्याचे वृत्त आहे.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने काठमांडू प्रशासनाने सोमवारी कर्फ्यू लागू केला. मुख्य जिल्हा अधिकारी छविलाल रिजाल यांनी कलम ६ अंतर्गत हा आदेश जारी केला.

दुपारी १२:३० ते रात्री १० वाजेपर्यंत लागू असलेला कर्फ्यू न्यू बानेश्वर चौक, एव्हरेस्ट हॉटेल, बिजुली बाजार, मिन भवन, शांतीनगर मार्गे टिनकुने चौक, तसेच शंखमूल पूल आणि इप्लेक्स मॉल परिसरात लागू आहे. या काळात हालचाल, निदर्शने, सभा आणि घेराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

८ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनात दररोज तरुणाईचा सहभाग वाढत आहे. भ्रष्टाचाराविरोधातही घोषणाबाजी होत असून सोशल मीडिया बंदी ही संतापाची मुख्य ठिणगी ठरली आहे.

सरकारचे म्हणणे आहे की “नेपाळमध्ये जेव्हा या कंपन्या कार्यालये उघडतील आणि अधिकृत नोंदणी करतील, तेव्हाच सोशल मीडियावरील बंदी उठवली जाईल.” आतापर्यंत टिकटॉक, व्हायबर, निंबुझ, विटाक आणि पोपो लाईव्ह या काही प्लॅटफॉर्म्सनीच नेपाळमध्ये नोंदणी केली आहे.

नेपाळमध्ये सोशल मीडिया हा युवकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे बंदीमुळे तरुणाई सरकारविरुद्ध आक्रमक झाली आहे. कर्फ्यू आणि पोलिस कारवाईनंतरही निदर्शने थांबलेली नाहीत. उलट ‘जनरल-झेड क्रांती’ आणखी तीव्र होत असून नेपाळचे राजकारण आणि समाजजीवन अस्थिरतेकडे वाटचाल करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गांधींच्या तत्त्वज्ञानावर चालणे हीच खरी श्रद्धांजली'! CM सावंतांचे प्रतिपादन; ‘गावांच्या विकासाचे’ स्वप्न सत्यात आणण्यासाठी करणार प्रयत्न

Mapusa Accident: दुःखद घटना! कार-दुचाकीची धडक; चालकाची हरपली शुद्ध; 3 दिवसांनी झाला मृत्यू

Goa IIT Project: धारगळ, लोलये ते कोडार! ‘आयआयटी’ला राज्यात 10 ठिकाणी नकारघंटा; सरकारसमोर पेच

GMC Reservation: महत्वाची बातमी! वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात OBC आरक्षण लागू; आरोग्य खात्याकडून आदेश जारी

Mayem: 'गोवा मुक्त झाला, आम्ही अद्यापही पारतंत्र्यात'! नवीन अधिसूचनेविरुद्ध शेतकरी एकवटले; सरकारच्या निर्णयाविरोधात ‘एल्गार’

SCROLL FOR NEXT