Nepal flood viral video of brother carrying younger sister Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

Nepal Floods Viral Video Boy Carrying Sister: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराच्या भीषण संकटात एका हृदयद्रावक दृश्याने संपूर्ण जगाचे डोळे पाणवले.

Manish Jadhav

Nepal Floods Viral Video Boy Carrying Sister: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराच्या भीषण संकटात एका हृदयद्रावक दृश्याने संपूर्ण जगाचे डोळे पाणवले. पुराच्या हाहाकारात आई-वडिलांपासून ताटातूट झाल्यानंतर एका लहान भावाने आपल्या चिमुकल्या बहिणीला पाठीवर उचलून घेत पालकांचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सोशल मीडियावर या चिमुकल्या भावा-बहिणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, पुराच्या भयानक परिस्थितीतही भाऊ आपल्या लहान बहिणीचे रक्षण करताना दिसत आहे. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, हे दृश्य पाहून नेटकऱ्यांनी प्रचंड हळहळ व्यक्त केली.

'X' वर @JeetN25 नावाच्या युजरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये लहान मुलाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांचे व खरचटल्याचे व्रण स्पष्ट दिसत आहेत. स्वतः अत्यंत घाबरलेल्या स्थितीत असतानाही, तो आपल्या रडणाऱ्या लहान बहिणीला पाठीवर घेऊन चिखल आणि ढिगाऱ्यातून मार्ग काढत पालकांना शोधत आहे. लहानग्या वयात बहिणीसाठी ढालीसारखे उभे राहणाऱ्या या चिमुकल्या भावाच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुरामुळे झालेल्या विनाशात बचावकार्य वेगाने सुरु असले तरी, अनेक निष्पाप बालके आपल्या कुटुंबापासून दुरावली आहेत आणि हा व्हिडिओ त्याच भीषण वास्तवाची जाणीव करुन देतो.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक युजर्सनी या भावाला 'लिटल हिरो' असे संबोधले असून, त्याच्या धैर्याला सलाम केला. काहींनी 1988 मधील प्रसिद्ध 'ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज' या जपानी अ‍ॅनिमेशन चित्रपटाची आठवण काढली, ज्यामध्ये महायुद्धात अनाथ झालेल्या दोन भावा-बहिणींचा असाच संघर्ष दाखवण्यात आला होता. तर दुसरीकडे, मुलांची मदत करण्याऐवजी व्हिडिओ शूट करणाऱ्या कॅमेरामनवर काही नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

आपल्या चिमुकल्या खांद्यावर संपूर्ण जगाचे ओझे वाहणाऱ्या या भावाची आणि बहिणीची लवकरात लवकर त्यांच्या आई-वडिलांशी भेट व्हावी, अशी प्रार्थना जगभरातून केली जात आहे. नेपाळ सरकारने अशा अनाथ आणि दुरावलेल्या बालकांची तातडीने जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही सोशल मीडियावर लावून धरली जात आहे. हा व्हिडिओ स्वतंत्रपणे सत्यापित झालेला नसला तरी, नेपाळमधील महापुराने हजारो निष्पापांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त केले आहे, याचे अस्वस्थ करणारे चित्र यातून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT