Navanethem Navi Pillay  Dainik Gomantak
ग्लोबल

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Navanethem Navi Pillay Nobel Peace Prize 2026: यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या मानवाधिकार कायदेतज्ज्ञ आणि भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना जाहीर झाला.

Manish Jadhav

Navanethem Navi Pillay Nobel Peace Prize 2026: यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या मानवाधिकार कायदेतज्ज्ञ आणि भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना जाहीर झाला. 85 वर्षीय पिल्लई यांनी दक्षिण आफ्रिकेतील उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केले. तसेच, 2008 ते 2014 दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्या आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि रवांडासाठीच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी लवादाच्या अध्यक्षाही राहिल्या.

शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला बळकटी देण्यासाठी त्यांनी केलेल्या निरंतर प्रयत्नांचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जोर्गेन वाट्ने फ्राइडनेस यांनी सांगितले की, अधिक शांततापूर्ण जग निर्माण करु इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी पिल्लई यांचे कार्य म्हणजे एक मोठी आशा आणि प्रेरणेचा स्त्रोत आहे.

युद्ध आणि जागतिक संघर्ष सातत्याने वाढत असताना आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या संस्था व न्यायाधीशांवर राजकीय दबाव वा हल्ले होत असताना, बळाचा वापर न करता कायदेशीर मार्गाने संघर्ष सोडवण्याची ताकद केवळ आंतरराष्ट्रीय कायद्याच्या राजवटीवर अवलंबून असते, याची आठवण नोबेल समितीने करुन दिली. युद्धअपराध्यांना जबाबदार धरत अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देणारी आंतरराष्ट्रीय कायदेशीर व्यवस्था शांततापूर्ण जगासाठी अत्यंत आवश्यक अट असल्याचेही समितीने म्हटले.

पिल्लई मूळच्या भारतीय आहेत. त्यांचा जन्म 1941 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील नटाल प्रांतातील डर्बन येथील एका गरीब कुटुंबात नारायणसामी नायडू आणि संथामा नायडू यांच्यापोटी झाला. त्यांचे आजी-आजोबा 1890च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील उसाच्या मळ्यांमध्ये मजुरी करण्यासाठी भारतातून (India) गेले होते. यंदा नोबेल शांतता पुरस्काराचे 125 वे वर्ष असून ओस्लो येथील नॉर्वेजियन नोबेल समितीला या पुरस्कारासाठी 287 उमेदवारांचे नामांकन प्राप्त झाले होते, ज्यामध्ये 25 टक्क्यांहून अधिक संस्थांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

SCROLL FOR NEXT