Asteroid 2003 MH4 Earth approach  Dainik Gomantak
ग्लोबल

पृथ्वीवर येणार मोठी आपत्ती! हजारो अणुबॉम्बची ताकद असणारा दगड आदळणार?

NASA Asteroid Warning 2025: कल्पना करा आकाशातून पृथ्वीकडे एक दगड येत आहे, तो जर आदळला तर हजारो अणुबॉम्बसारखा विनाश घडवेल. ही कोणत्याही विज्ञानकथेतील चित्रपटाची पटकथा नाही, तर नासाचा ताजा इशारा आहे.

Manish Jadhav

कल्पना करा... आकाशातून पृथ्वीकडे एक दगड येत आहे, जर तो आदळला तर हजारो अणुबॉम्बसारखा विनाश घडवेल. ही कोणत्याही विज्ञानकथेतील चित्रपटाची पटकथा नाहीतर नासाचा ताजा इशारा आहे. 24 मे 2025 रोजी म्हणजेच उद्या (शनिवारी) 2003 MH4 नावाचा एक महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.

जरी यापासून थेट धोका नसला तरी चिंता वाढवणारी घटना असणार आहे. पण शास्त्रज्ञ ते हलक्यात घेण्यास तयार नाहीत. हा लघुग्रह सुमारे 335 मीटर रुंद आहे, म्हणजेच तीन फुटबॉल मैदानांइतका लांब आहे. त्याचा वेगही कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा कमी नाही. 14 किलोमीटर प्रति सेकंद एवढा वेग आहे. हा लघुग्रह अपोलो गटाचा भाग आहे, जो खडकांचा एक समूह असून जो सामान्यतः पृथ्वीच्या कक्षा ओलांडतो.

तो पृथ्वीच्या किती जवळ येईल?

2003 MH4 पृथ्वीपासून (Earth) 6.69 दशलक्ष किलोमीटर अंतरावरुन जाईल. हे अंतर चंद्र आणि पृथ्वीमधील अंतरापेक्षा 17 पट जास्त आहे. नासाच्या सेंटर फॉर निअर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) ने त्याला संभाव्य धोकादायक लघुग्रह (PHA) घोषित केले आहे. याचा अर्थ असा नाही की तो लगेच पृथ्वीवर आदळेल, परंतु भविष्यात त्याच्या कक्षेत थोडासाही बदल झाला तर तो धोका बनू शकतो याचे हे संकेत आहेत. असे बदल यार्कोव्स्की परिणामामुळे (सूर्याच्या उष्णतेमुळे होणारे बदल) किंवा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होऊ शकतात.

शास्त्रज्ञ इतके निरीक्षण का करत आहेत?

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, जर एवढा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर तो हजारो अणुबॉम्बइतकी ऊर्जा सोडू शकतो. याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात आगी लागणे, भूकंप, त्सुनामी आणि दीर्घकाळ टिकणारे हिवाळे, ज्यामध्ये सूर्यप्रकाश देखील थांबू शकतो. सध्या टक्कर होण्याचा धोका नसल्याचे नासाने म्हटले असले तरी लघुग्रहाच्या हालचाली आणि संरचनेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. येत्या काळात कोणतेही अनपेक्षित धोके उद्भवणार नाहीत याची खात्री करण्यासाठी त्याची घनता, पोत आणि परावर्तक गुणधर्म (तो किती प्रकाश परावर्तित करतो) यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला जात आहे.

ग्रह संरक्षण का आवश्यक आहे?

या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, पृथ्वीला बाह्य अवकाशातूनही धोका असू शकतो. म्हणूनच नासा आणि जगभरातील अंतराळ संस्था प्लॅनेटरी डिफेन्स मोहिमांवर काम करत आहेत. जसे की, DART मिशन - जे भविष्यात अशा लघुग्रहांना विचलित करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT