NASA  Dainik Gomantak
ग्लोबल

NASA च्या अंतराळवीरांचे मोठे यश, घाम अन् ....पासून लावला पिण्यायोग्य पाण्याचा शोध,पाहा Video

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने एक मोठे यश मिळवले आहे.

Puja Bonkile

NASA: अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने एक मोठे यश मिळवले आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांच्या युरिन आणि घामाचा पुनर्वापर करून  98% पिण्या योग्य पिणी तयार केले आहे. 

Space.com च्या बातमीनुसार अंतराळ स्थानकावरील प्रत्येक अंतराळवीराला पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी आणि साफसफाईसाठी दररोज एक गॅलन पाणी लागते. या शोधासाठी अंतराळवीरांनी पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणाली (ECLSS) चा भाग असलेल्या प्रणालींचा वापर केला आहे.

ECLSS म्हणजे पर्यावरण नियंत्रण आणि लाइफ सपोर्ट सिस्टीम, ज्याचे उद्दिष्ट अंतराळात पुढील वापरासाठी अन्न, हवा आणि पाणी यासारख्या गोष्टींचा पुनर्वापर करणे आहे.

ECLSS ज्या हार्डवेअरपासून बनलेले आहे त्यात पाणी पुनर्प्राप्ती प्रणाली समाविष्ट आहे. जे सांडपाणी गोळा करते आणि वॉटर प्रोसेसर असेंब्लीला पाठवते. त्यानंतर पिण्यायोग्य पाणी तयार होते. 

केबिन क्रूच्या श्वासाने आणि घामाने केबिन हवेतील ओलावा गोळा करण्यासाठी प्रगत डिह्युमिडिफायरचा वापर केला जातो. याशिवाय, युरिन प्रोसेसर असेंब्ली, व्हॅक्यूम डिस्टिलेशन वापरून युरिनमधून पाणी काढले जाते.

क्रिस्टोफर ब्राउन, जॉन्सन स्पेस सेंटर टीम सदस्य जे स्पेस स्टेशनच्या लाइफ सपोर्ट सिस्टीमचे व्यवस्थापन करतात. ते म्हणाले की बीपीएने युरिनमधून काढलेल्या स्वच्छ पाण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवरून 98 टक्क्यांपर्यंत वाढवले, जे आतापर्यंतचे सर्वोच्च आहे. ते म्हणाले की पिण्यायोग्य पाणी पुनर्वापर करण्याची ही पद्धत मंगळ सारख्या दीर्घ अंतराळ मोहिमांमध्ये मदत करू शकते.

दरम्यान अंतराळात पाण्याचा शोध म्हणजे नवीन जीवनाचा शोध आहे. अंतराळात शास्त्रज्ञांनी एका पद्धतीने 98 टक्के पाणी पुनर्संचयित केले आहे. याकडे मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बापरे! वीज कार्यालयातील छताचा भाग कोसळला खाली; म्हापशातील घटनेने चिंतेचे वातावरण

विश्वविजेत्या भारतीय संघावर 131 कोटींचा वर्षाव! गौतम गंभीर, कॅप्टन सूर्याला किती रुपये मिळणार? वाचून व्हाल थक्क..

Premier League Auction: 'दर्शन' गोव्यातील महागडा क्रिकेटपटू! प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा लिलाव; 21 मार्चपासून रंगणार स्पर्धा

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराबाबत महत्वाची बातमी! T20 मध्ये घेणार मोठा ब्रेक; कारण आले समोर..

Tiger Reserve Goa: व्‍याघ्र प्रकल्‍पाबाबत होणाऱ्या सुनावण्‍यांवर 1 कोटीपेक्षा अधिक खर्च, वनमंत्री राणेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT