VIDEO: गोव्यातील प्रसिद्ध किनारा, पण खाडीचे पाणी मात्र प्रदूषित; काळसर पाण्यामुळे नागरिक, पर्यटक त्रस्त

Colva Creek Pollution: सासष्टीतील कोलवा समुद्रकिनारा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असला, तरी किनाऱ्याजवळील खाडीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
Colva Creek Pollution
Colva Creek PollutionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: सासष्टीतील कोलवा समुद्रकिनारा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असला, तरी किनाऱ्याजवळील खाडीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. खाडीतील पाणी पुन्हा एकदा अस्वच्छ झाले असून त्यावर काळसर थर दिसत आहे. दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक व पर्यटक त्रस्त झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन व जलस्रोत खात्याद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करून खाडीतील गाळ काढण्याचे काम करण्यात आले. मात्र, काही काळानंतर खाडी पुन्हा पूर्ववत अस्वच्छ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Colva Creek Pollution
St Inez Creek: खाडी की गटारगंगा? सांतिनेजमध्ये दूषित काळेकुट्ट पाणी; अजगर, मासे सापडताहेत मृतावस्थेत

या पार्श्वभूमीवर समाजकार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी स्थानिक आमदारांवर टीका करत खर्चाची सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. खाडीत येणाऱ्या सांडपाणी, कचरा व दुर्गंधीचा नेमका स्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात राज्याच्या गृह, दक्षता व गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रारही दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

Colva Creek Pollution
Goa Politics: खरी कुजबुज; ...काँग्रेस उत्‍पलसोबत राहणार?

कामात पारदर्शकता नाही!

दर सहा महिन्यांनी खाडी स्वच्छतेसाठी निविदा काढली जाते. मात्र, कंत्राटदार नेमके काय काम करतात याबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोपही होत आहे. निविदेनुसार दोन वर्षे देखरेखीची जबाबदारी असतानाही वारंवार नवीन निविदा काढल्या जात असल्याने संशय व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Rainfall Deficit 2026
 Shappora River water Goa
Mhadei Water Dispute
Tillari Water Diversion
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com