होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! भारताची 18 जहाजे अडकली; देशावर ऊर्जा संकटाचे सावट

Global war impact India : मध्यपूर्वेतील युद्ध आता भीषण वळणावर पोहोचले असून, त्याचा थेट फटका भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बसला आहे.
Middle East War Impact
Strait of Hormuz warDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील युद्ध आता भीषण वळणावर पोहोचले असून, त्याचा थेट फटका भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बसला आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या 'होर्मुझची सामुद्रधुनी' सध्या युद्धामुळे ठप्प झाली आहे. या भागात भारताचा कच्चा तेल, एलपीजी आणि एलएनजी पुरवठा करणारी तब्बल १८ भारतीय जहाजे अडकून पडली आहेत. याशिवाय १० जहाजेही भारताकडे येण्यासाठी याच भागात ताटकळत उभी असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

सामुद्रधुनीत जहाजांची कोंडी आणि खलाशांची सुरक्षा

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या पश्चिमेला अडकलेल्या १८ भारतीय जहाजांमध्ये ३ एलपीजी टँकर, १ एलएनजी कॅरियर आणि ४ कच्च्या तेलाच्या टँकरचा समावेश आहे.

या जहाजांवर सुमारे ४८५ भारतीय खलाशी असून सरकार त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या भागात ५०० हून अधिक जहाजे अडकली आहेत. इराणने "बिनशत्रू" जहाजांना समन्वय साधून जाण्याची परवानगी दिली असली, तरी धोका अद्याप टळलेला नाही.

Middle East War Impact
Goa Theft: फोंड्यात ज्वेलरी शॉपमधून 1.14 कोटींचे सोने लंपास; कर्मचाऱ्यांवरच संशयाची सुई

वाढता विमा हप्ता आणि आर्थिक फटका

युद्धामुळे या सागरी क्षेत्राला 'उच्च जोखीम क्षेत्र' घोषित करण्यात आले आहे. याचा परिणाम व्यावसायिक जहाजांच्या विमा हप्त्यावर झाला आहे. युद्धापूर्वी जो विमा हप्ता ०.०४ टक्के होता, तो आता थेट ०.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

काही प्रकरणांमध्ये हा आकडा याहूनही अधिक असू शकतो. या वाढीव खर्चामुळे आगामी काळात इंधन आणि गॅसच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताला लागणारे ४० टक्के कच्चे तेल आणि ९० टक्के एलपीजी याच मार्गाने येतो, त्यामुळे हा मार्ग भारतासाठी जीवनवाहिनी ठरतो.

Middle East War Impact
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

आतापर्यंत ८ जहाजे सुखरूप बाहेर

परिस्थिती गंभीर असली तरी काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत ८ भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून यशस्वीरित्या बाहेर पडली आहेत. यामध्ये 'BW TYR' हे ९४,००० टन एलपीजी घेऊन ३१ मार्च रोजी मुंबईला पोहोचणार आहे, तर 'BW ELM' हे १ एप्रिल रोजी मंगळूरला पोहोचण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही जग वसंत आणि जग लाडकी यांसारख्या जहाजांनी सुरक्षित प्रवास पूर्ण केला आहे. भारत सरकार सध्या मुत्सद्दी पातळीवर इराणशी चर्चा करून अडकलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com