American Billionaire And Investor Ray Dalio Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकन अब्जाधीशाकडून मोदींची चीनच्या दिग्गज नेत्याशी तुलना; म्हटलं...

ते पुढे म्हणाले की, '1984 मध्ये जेव्हा मी तिथे जायला सुरुवात केली तेव्हा चीन होता तिथे भारत आज उभा आहे.

Manish Jadhav

American billionaire and investor Ray Dalio: अमेरिकन अब्जाधीश आणि गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची प्रशंसा केली असून भारताचा संभाव्य विकास दर उर्वरित जगाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे.

डॅलिओ म्हणाले की, त्यांनी पुढील 10 वर्षांसाठी भारतासह जगातील शीर्ष 20 देशांच्या विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात त्यांनी भारताला चांगले रेटींग दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, ''1984 मध्ये जेव्हा मी तिथे जायला सुरुवात केली तेव्हा चीन होता तिथे भारत आज उभा आहे. त्यामुळे, जर तुम्ही दरडोई उत्पन्नाचा पॅटर्न बघितला तर मला वाटतं, मोदी हे डेंग झियाओपिंग आहेत.

त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि रचनात्मक विकास साधण्याची कला आहे. भारत (India) खूप महत्त्वाचा आहे. मला वाटत नाही की, कोणताही मुद्दा भारताला थांबवेल."

डॅलिओ पुढे असेही म्हणाले की, "इतिहासात तटस्थ राहिलेल्या देशांनी चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ते देश युद्धांतील विजेत्यांपेक्षा सरस ठरले आहेत. कारण आमचा देश चीन आणि त्याचे मित्र राष्ट्र, रशिया वगैरेंशी संघर्ष करत आलेला आहे. परंतु भारतासारख्या देशांना याचा चांगला लाभ मिळत आहे."

डेंग झियाओपिंग कोण होते?

डेंग झियाओपिंग हे चीनचे (China) क्रांतिकारी आणि सुधारणावादी नेते होते, ज्यांनी माओ झेडोंगच्या मृत्यूनंतर चीनच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावला.

डिसेंबर 1978 ते नोव्हेंबर 1989 या कालावधीत त्यांनी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे सर्वोच्च नेते म्हणून काम पाहिले. 1976 मध्ये माओ झेडोंगच्या मृत्यूनंतर, डेंग हळूहळू चीनचे सर्वोच्च नेते बनले. माओच्या मृत्यूनंतर चीन राजकीय आणि आर्थिक संकटांनी घेरला होता.

माओची सर्वहारा सांस्कृतिक क्रांती आणि त्यानंतरच्या गटबाजीमुळे देशाचा बराचसा भाग गरीब आणि एकाकी पडला, परंतु जेव्हा डेंग झियाओपिंग यांनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी आर्थिक सुधारणांची एक दीर्घ मालिका सुरु केली.

त्यामुळे चीन पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. या कारणास्तव डेंग यांना "आधुनिक चीनचे शिल्पकार" देखील म्हटले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

Beach Shack sealed: हणजूण किनाऱ्यावरील प्रसिद्ध ‘कर्लिस बीच शॅक’ला टाळे! CRZ चे उल्लंघन; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

Goa Nightclub Fire: 'क्लबमधील आगीच्या दुर्घटनेला कर्मचारी जबाबदार'! लुथरा बंधूंनी झटकले हात; पोलिस तपासात असहकार्य

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT