Mexico Dainik Gomantak
ग्लोबल

मेक्सिकोत सायकलस्वारांचं अनोखं आंदोलन; विवस्त्र होत काढली पदयात्रा

मेक्सिको सिटीमध्ये सुरक्षित सायकल चालवण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं.

दैनिक गोमन्तक

मेक्सिको सिटीमध्ये सुरक्षित सायकल चालवण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सहभाग घेतलेल्यांनी मेक्सिकोच्या रस्त्यावर विवस्त्र होऊन पदयात्रा काढली. (Naked cyclists have demanded road safety in Mexico)

मागच्या दोन वर्षात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच वर्ल्ड नेक्ड बाईक राईड होती. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Corona) संकटामुळे ही राईड आयोजित करण्यात अडथळे येत होते. महत्त्वाची बाब म्हणजे आंदोलनकर्त्या सायकलचालकांनी तब्बल 17 किलोमीटर्सचा मार्ग सायकल हातात घेत पदयात्रा काढली. सध्या याच अनोख्या आंदोलनाची जगभरात चर्चा सुरु आहे.

दुसरीकडे, आयोजकांनी म्हटले आहे की, स्थानिक प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून सायकल (Bicycle) चालवण्यास प्रोत्साहन देत असले तरी, पादचारी आणि सायकलस्वारांमध्ये सुरक्षेबाबत जनजागृती मोहिमेचा अभाव आहे

तसेच, या वर्षीची ब्राइटन नेकेड बाईक राईड पूर्वीपेक्षा मोठी आहे. ज्यामध्ये तब्बल 1,000 सायकलस्वार उद्या दुपारी संपूर्ण शहरात सात मैल सायकल चालवतील. सायकलस्वार दुपारी 2 वाजता संपूर्ण शहरातून (City) निघण्यापूर्वी प्रेस्टन पार्क येथे त्यांच्या बाईक सजवतील. हा मार्ग रॉयल पॅव्हेलियन, पॅलेस पिअर, द लेन्स, नॉर्थ लेन आणि i360 च्या पुढे नग्न दुचाकीस्वारांना घेऊन जाईल. त्याचबरोबर संध्याकाळी 4.30 वाजता पोस्ट-राइड पिकनिकसाठी ब्लॅक रॉक नॅचरिस्ट बीचवर थांबतील. विशेष म्हणजे, या ब्राइटन नेकेड बाईक राईडचा उद्देश हवामान बदलाचा निषेध करणे हा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT