Nairobi Explosion Video Viral Latest Update: केनियाची राजधानी नैरोबी येथील गॅस प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाचे आणि त्यानंतर लागलेल्या आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये प्रचंड ज्वाला उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य दाखवत आहेत. आगीत भाजल्याने तिघांचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. गुरुवारी रात्री हा स्फोट झाला होता. हा प्लांट रहिवासी भागात असून त्यातील सिलिंडर फुटले, मात्र सिलिंडर का फुटले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, नैरोबीच्या एम्बाकसी जिल्ह्यात गुरुवारी रात्री 11:30 वाजता (20:30 GMT) गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या लॉरीचा स्फोट झाला, ज्यामुळे मोठी आग लागली. संपूर्ण प्लांट जळून खाक झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, लोकांना आकाशात दूरवर ज्वाळा दिसत होत्या. तर शहरात भूकंपाचे धक्के दूरवर जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला. लोक घराबाहेर पडले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक घरे, कार्यालये आणि गाड्याही आगीत जळून खाक झाल्या आहेत. एम्बाकसी पोलीस प्रमुख वेस्ली किमेटो यांनी सांगितले की, स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. केनिया रेड क्रॉस सोसायटीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या टीमने 271 लोकांना रुग्णालयात नेले आणि 27 जखमींवर घटनास्थळी उपचार करण्यात आले. जखमींमध्ये किमान 25 मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. जखमींना सरकार सर्वतोपरी मदत करत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.