Vivek Ramaswamy Campaign: Dainik Gomantak
ग्लोबल

US Election: "माझ्या हिंदू धर्माने मला अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची प्रेरणा दिली"

Vivek Ramaswamy: "मी हिंदू आहे, माझा एका खऱ्या देवावर विश्वास आहे. माझा विश्वास आहे की, देवाने आपल्या सर्वांना इथे एका खास उद्देशासाठी पाठवले आहे."

Ashutosh Masgaunde

"My Hinduism inspired me to run for president," Says US presidential candidate Vivek Ramaswamy:

अमेरिकेचे अध्यक्ष पदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचे हिंदू धर्मासंदर्भातील वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

द डेली सिग्नलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या एका उत्तरात विवेक रामास्वामी म्हणाले की, "हिंदू धर्माने मला अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची प्रेरणा दिली आणि त्यामुळेच आज मी निवडणुकीत उतरलो आहे. पुढे हिंदू धर्माबाबत ते म्हणाले की, या धर्माने मला नैतिक जबाबदाऱ्या समजून घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे."

रामास्वामी म्हणाले की, "मी हिंदू आहे, माझा एका खऱ्या देवावर विश्वास आहे. माझा विश्वास आहे की, देवाने आपल्या सर्वांना इथे एका खास उद्देशासाठी पाठवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. आपण सर्व समान आहोत कारण आपल्या सर्वांमध्ये देव वास करतो, हा आपल्या धर्माचा गाभा आहे."

ते पुढे म्हणाले, "मी एका अतिशय पारंपारिक कुटुंबात जन्मलो आणि वाढलो. कुटुंब हा आपला पाया आहे हे माझ्या आई-वडिलांनी मला शिकवले. आई-वडिलांचा आदर केला पाहिजे, लग्न हे पवित्र नाते आहे, लग्नापूर्वी संयम आवश्यक आहे. विवाह स्त्री आणि पुरुष यांच्यात होतो. घटस्फोट नाही. एक पुरुष आणि एक स्त्री देवासमोर लग्न करतात. तो आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी देवासमोर शपथ घेतो."

आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना विवेक रामास्वामी म्हणाले, "मी 10वीत असताना एका ख्रिश्चन शाळेत गेलो, जिथे मी 10 आज्ञा शिकलो. देव सत्य आहे, देव एक आहे. त्याचे नाव व्यर्थ घेऊ नका. आपल्या पालकांचा आदर करा. खोटे बोलू नका. चोरी करू नका. व्यभिचार करू नका. हे सर्व शिकलो तेव्हा मी खूप लहान होतो. मला वाटतं या शिकवणी फक्त हिंदूंसाठी नाहीत. ती ख्रिश्चनांची शिकवणही नाही, परंतु मला वाटते की ती खरोखर देवाची शिकवण आहे. मी एक राष्ट्रपती होऊ शकतो जो ख्रिस्ती धर्माचा प्रचार करेल? अजिबात नाही आणि याची अनेक कारणे आहेत. या मूल्यांसाठी आणि या तत्त्वांसाठी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते आणि मी ते करीन.

कोण आहे विविक रामास्वामी?

विवेक रामास्वामी यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये फॉक्स न्यूजच्या प्राइम टाइम शोमध्ये मुलाखतीदरम्यान 2024 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवारीचा दावा केला. सध्या ते 38 वर्षांचे आहेत. रामास्वामी हे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत.

रामास्वामी यांचा जन्म ओहिया येथे झाला. त्याचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्राची पदवी मिळवली आणि नंतर येल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला.

रामास्वामी यांनी बायोटेक कंपनीही सुरू केली आहे. त्यांनी 'Woke Inc.' ची स्थापना केली. यासह अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या पुस्तकांमुळे त्यांना ओळख मिळण्यास मदत झाली. रामास्वामी यांनी 2024 मध्ये आपल्या विजयाचा दावाही केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT