मिस्ट्री बाइक रायडर ठरतायेत दहशतवाद्यांचा कर्दनकाळ; कुणाला मशिदीत उडवले तर कुणाला...

Pakistan Mystery Bike Rider Shoot 12 Terrorist In 2 Year: पाकिस्तान सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आला आहे.
Pakistan Mystery Bike Rider Shoot 12 Terrorist In 2 Year
Pakistan Mystery Bike Rider Shoot 12 Terrorist In 2 YearDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Mystery Bike Rider Shoot 12 Terrorist In 2 Year: पाकिस्तान सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आला आहे. यातच आता, पाकिस्तानच्या विविध भागांत डझनहून अधिक दहशतवाद्यांचा गूढपणे मृत्यू झाला आहे. हे सर्व दहशतवादी भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत होते.

या हत्यांबाबत पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रधार आणि तेथील सरकारने मौन बाळगले आहे. मारले गेलेले सर्व दहशतवादी कमांडर लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन, फुटीरतावादी खलिस्तान चळवळ किंवा जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच, लष्कर आणि जैशचे तीन दहशतवादी मारले गेले, ज्यात मौलाना मसूद अझहरचा एक सहकारी आणि संघटनेत तरुणांची भरती करणारा कमांडर होता.

दरम्यान, लाहोरमध्ये (Lahore) लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर, 2021 मध्ये पाकिस्तानात हत्यांचे सत्र सुरु झाले. याच धर्तीवर हे सर्व खून झाले आहेत. या सर्व घटनांमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात सशस्त्र व्यक्तींचा सहभाग आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानी अधिकारी या हत्यांसाठी भारताच्या गुप्तचर संस्थेला जबाबदार धरतात. पाकिस्तानी अधिकारी यूएईमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय एजन्सीच्या एजट्संना जबाबदार धरत आहेत.

Pakistan Mystery Bike Rider Shoot 12 Terrorist In 2 Year
Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर दहशतवादी हल्ला, 3 अतिरेकी ठार, 3 विमाने जाळून खाक

पाकिस्तान सरकारने मौन बाळगले

दुसरीकडे, या हत्यांबाबत पाकिस्तान (Pakistan) सरकारसोबत तिथली मीडियाही मौन बाळगून आहे. 2021 मध्ये, पाकिस्तानचे तत्कालीन गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी हाफिज सईदच्या लाहोर येथील निवासस्थानाबाहेर बॉम्बस्फोट झाल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यानंतर तेथील सरकारने लष्कर, जेएम, एचयूएम आणि खलिस्तान फुटीरतावादी चळवळीशी संबंधित दहशतवाद्यांच्या गूढ हत्यांबाबत मौन बाळगले. विशेष म्हणजे, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकही दहशतवादी असल्याची ओळख पटलेली नाही.

त्याचवेळी, पाकिस्तान सरकारने मसूद अझहरचा सहकारी मौलाना रहीम उल्लाह तारिक याच्या हत्येला मौलवीची हत्या असल्याचे म्हटले आहे.

या दहशतवाद्यांची हत्या करण्यात आली

तसेच, 5 नोव्हेंबर रोजी मियां मुजाहिद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्वाजा शाहिद याची पाकिस्तानमध्ये अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. नंतर त्याचा मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ सापडला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर होता आणि सुंजवान येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर 2018 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता.

ऑक्टोबरमध्ये, जैश-ए-मोहम्मदचा 2016 च्या पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची सियालकोटमध्ये मोटरसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात लतीफचा एक सहकारीही मारला गेला होता.

Pakistan Mystery Bike Rider Shoot 12 Terrorist In 2 Year
Pakistan: नवाझ शरीफ यांचा 'वनवास' संपला, चार वर्षांनंतर पाकिस्तानात परतले, इम्रान खानचे भाकीत खरे ठरले!

सप्टेंबर 2023: धनगरी दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार रियाझ अहमद, पीओकेमधील मशिदीत मारला गेला.

सप्टेंबर 2023: लष्कर-ए-तैयबाचा मौलाना झियाउर रहमान कराचीच्या गुलिस्तान-ए-जोहर भागात मारला गेला.

सप्टेंबर 2023: लष्कर-ए-तैयबाचे मुफ्ती कैसर फारुकी याची सोहराब गोठ, कराची येथे हत्या.

ऑगस्ट 2023: जमात-उद-दावाचा मुल्ला सरदार हुसैन अरैन याची सिंधमधील नवाब शाह जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Pakistan Mystery Bike Rider Shoot 12 Terrorist In 2 Year
Pakistan: पाकिस्तानातील गरिबांचे जगणे झाले कठीण, तस्कर पैशासांठी 1 कोटी रुपयांना विकतायेत किडनी!

मे 2023: खलिस्तान कमांडो फोर्सचा पाकिस्तान नेता परमजीत सिंग पंजवार यांची लाहोरच्या जोहर टाउनमध्ये हत्या करण्यात आली.

मार्च 2023: हिजबुल मुजाहिद्दीनचा बशीर अहमद पीर रावळपिंडीत ठार झाला.

मार्च 2023: खैबर आदिवासी जिल्ह्यात प्रख्यात जिहादी सय्यद नूर मारला गेला.

फेब्रुवारी 2023: अल-बद्र मुजाहिद्दीनचा सय्यद खालिद रझा याची कराचीत हत्या.

मार्च 2022: जैश-ए-मोहम्मदचा मेकॅनिक जहूर इब्राहिम, काठमांडू ते दिल्ली या फ्लाइट IC 814 च्या पाच अपहरणकर्त्यांपैकी एक, कराचीमध्ये ठार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com