UAE Dainik Gomantak
ग्लोबल

तीन कोटींहून अधिक भारतीयांचे परदेशात वास्तव्य, 'या' मुस्लिम देशाला सर्वाधिक पसंती

Indians Overseas: अमेरिकेत ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान, 96,917 भारतीय बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले.

Manish Jadhav

Indians Overseas: अमेरिकेत ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान, 96,917 भारतीय बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या ताज्या अहवालात ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

96,917 भारतीयांपैकी 30,010 कॅनडाच्या सीमेवरुन अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले. तर मेक्सिकन सीमेवरुन 41,770 लोकांना अवैधरित्या सीमा ओलांडताना पकडण्यात आले. उर्वरित 25,317 अमेरिकन मेनलॅंडमधून सीमा ओलांडल्यानंतर पकडले गेले.

2019-20 या वर्षाशी तुलना केल्यास ही संख्या 5 पट अधिक आहे. यासोबतच प्रवासासाठी किंवा काही कामानिमित्त अमेरिकेला जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.

पर्यटन मंत्रालयाच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालानुसार, 2 कोटींहून अधिक भारतीयांनी त्यांच्या सुट्टीसाठी आंतरराष्ट्रीय ठिकाणे निवडली. सध्या 3 कोटींहून अधिक भारतीय परदेशात स्थायिक झाल्याचे आकडेवारी सांगते. या लोकांना सामान्यतः एनआरआय म्हणतात.

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या 3,21,00,340 लोक परदेशात राहत आहेत. यापैकी 1,34,59,195 अनिवासी भारतीय (NRI) आणि 1,86,83,645 भारतीय वंशाच्या व्यक्ती (PIO) आहेत.

NRI आणि PIO मध्ये काय फरक आहे?

NRI आणि PIO मधील फरक अगदी स्पष्ट आहे. अनिवासी भारतीय हे भारतीय नागरिक आहेत जे नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी परदेशात राहतात. त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट असतो.

याउलट, पीआयओ अशी व्यक्ती आहे जी भारतीय वंशाची आहे परंतु त्याच्याकडे परदेशी पासपोर्ट आहे. हे लोक भारतीय नागरिक नाहीत.

अशा प्रकारे, अनिवासी भारतीय नेहमीच त्यांचे भारतीय नागरिकत्व टिकवून ठेवतात परंतु पीआयओ हे भारतीय वंशाचे परदेशी नागरिक असतात. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, भारतातील (india) अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क आहे, जो पीआयओकडे नाही.

यूएईमध्ये सर्वाधिक अनिवासी भारतीय आहेत

संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 34 लाखांहून अधिक अनिवासी भारतीय आहेत, जी सर्वात मोठी संख्या आहे. यानंतर सौदी अरेबियात (Saudi Arabia) 26 लाख तर अमेरिकेत 12.8 लाख भारतीय आहेत. विशेष म्हणजे, पीआयओच्या बाबतीत अमेरिका 31.8 लाखांसह अव्वल स्थानावर आहे.

यानंतर मलेशिया आणि म्यानमार आहेत, जिथे अनुक्रमे 27.60 लाख आणि 20 लाख भारतीय वंशाचे लोक राहतात. याशिवाय, दक्षिण आफ्रिका, फिजी, सिंगापूर, गयाना, सुरीनाम आणि इंडोनेशिया या देशांमध्ये पीआयओची लक्षणीय संख्या आहे.

ब्रिटीश राजवटीत सक्तीच्या मजुरीचा किंवा गुलामगिरीचा हा परिणाम आहे. इंग्रज बहुतेकांना शेतीच्या कामासाठी घेऊन गेले होते. हे असे लोक आहेत जे चांगल्या भविष्यासाठी तिथे गेले होते पण परत येऊ शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

India Economy: भारत होणार श्रीमंत अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्न पोचणार 4000 डॉलरपर्यंत; वाचा एसबीआय रिसर्चचा Report

Vande Mataram Cyclothon: 25 दिवसांत 6553 किमीची मोहीम! ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन’चा थरार; तारीख जाणून घ्या..

Goa Latest Updates: दुर्भाट, आडपई फेरीसेवेवर दाट धुक्यामुळे परिणाम

SCROLL FOR NEXT