PM मोदींचे अबुधाबीत आगमन, UAE च्या अध्यक्षांनी केले स्वागत

पंतप्रधान मोदींची शेवटचा UAE दौरा ऑगस्ट 2019 मध्ये झाला होता.
PM Modi UAE Visit
PM Modi UAE VisitTwitter/pmmodi
Published on
Updated on

G7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबुधाबी (Abu Dhabi) येथे पोहोचले आहेत. जिथे UAE चे अध्यक्ष झायेद अल नाहयान (Sheikh Mohamed bin Zayed) यांनी PM मोदींचे विमानतळावर स्वागत केले. UAE चे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिकरित्या शोक व्यक्त करणार आहेत. (PM Modi UAE Visit)

13 मे रोजी दीर्घ आजाराने नाह्यान यांचे निधन झाले होते ते 73 वर्षांचे होते. नाह्यान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांचे वर्णन एक महान आणि दूरदर्शी राजकारणी म्हणून केले होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि संयुक्त अरब अमीरातमधील संबंध समृद्ध झाले, असे मोदी म्हणाले.

PM Modi UAE Visit
G7 Summit: PM मोदींना भेटण्यासाठी जो बायडन आले धावत, पाहा Video

जर्मनीहून संयुक्त अरब अमिरातीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. पीएम मोदींनी ट्विट करून लिहिले की, 'महत्वाच्या दौऱ्यानंतर जर्मनी सोडत आहे. या भेटीदरम्यान मी G7 शिखर परिषदेला हजेरी लावली, अनेक जागतिक नेत्यांशी संवाद साधला आणि म्युनिकमधील एका संस्मरणीय समुदाय कार्यक्रमाला हजेरी लावली. या भेटीतील आदरातिथ्य केल्याबद्दल मी जर्मनीचे लोक, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ आणि जर्मन सरकारचे आभार मानतो. मला खात्री आहे की भारत-जर्मनी मैत्री आगामी काळात नवीन उंची गाठेल.'

PM Modi UAE Visit
UAE नंतर या मुस्लिम देशात बांधले जाणार हिंदू मंदिर, PM मोदी राहणार उपस्थित

मोदींची शेवटचा UAE दौरा ऑगस्ट 2019 मध्ये झाला होता. त्या दरम्यान त्यांना 'ऑर्डर ऑफ झायेद' हा UAE चा सर्वोच्च पुरस्कारहा UAE राष्ट्रपतींनी प्रदान केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीन आणि यूएस नंतर 2019-20मध्ये UAE भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता.UAE हे 2020-21 या वर्षासाठी जवळपास USD 16 अब्ज इतक्या रकमेसह भारतातील तिसरे मोठे निर्यात गंतव्यस्थान आहे. 2020 मध्ये UAE भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. अंदाजे 3.4 दशलक्ष भारतीय प्रवासी समुदाय UAE मधील सर्वात मोठा वांशिक समुदाय आहे जो देशाच्या लोकसंख्येच्या अंदाजे 35 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com