ग्लोबल

UNSC चे अध्यक्षपद संभाळणारे मोदी भारताचे पहिलेच पंतप्रधान

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताची ताकद वाढली असून (UNSC) त्याचे अध्यक्षपद भारताकडे (India presides over the United Nations Security Council) असून, यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. भारताला एका महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. जगात कोरोनाच्या (Covid19) संकटाबरोबरच समुद्री सुरक्षा, अफगाणिस्तान आणि आतंकवाद हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे युएनएससीच्या एका कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. युएनएससीचे अध्यक्षपद संभाळणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान (India's first Prime Minister) बनू शकतात.

युएनएससीच्या वतीने आज एक महिन्यासाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. याच्या अजेंड्यामध्ये महत्त्वाच्या मुद्यांना घेण्यासाठी भारत आपले राजकीय भागिदार असलेल्या फ्रांस, अमेरिका, रशिया आदी देशांच्या संपर्कात आहे. भारताच्या या तयारी मधून असे समोर येत आहे की, पंतप्रधान मोदी आणि विदेश मंत्री एस जयशंकर आणि सचिव हर्ष श्रृंगला हे अनेक विषयांवर बोलणार आहेत. पंतप्रधान मोदी कोणत्या विषयावर बोलणार याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.

संयुक्त राष्ट्राचे भारताचे माजी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांनी सोशल मिडियावर लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी हे युएनएससीमध्ये 9 ऑगस्टच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविण्याची शक्यता असून असे केल्यास ते भारताचे पहिले पंतप्रधान होऊ शकतात. यावर विदेश मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप होणे बाकी आहे. याबरोबरच भारताचे विदेश मंत्री देखील युएनएससीमध्ये भारताशी जोडणारे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे समोर येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT