Miracle of American Doctors Pig heart beats in human body  Dainik Gomantak
ग्लोबल

Science Miracle: मानवी शरीरात धडकणार डुकराचे हृदय

वैद्यकीय इतिहासातील हा पहिलाच प्रयोग असून यामुळे अवयवदानाच्या कमतरतेला सामोरे जाण्यास मदत होईल

दैनिक गोमन्तक

वॉशिंग्टन: अमेरिकेतील डॉक्टरांच्या टीमने (US Doctors) एक चमत्कार (Science Miracle) घडवून आणला आहे. या टीमने 57 वर्षीय पुरुषामध्ये जनुकीय सुधारित डुकराचे हृदय यशस्वीरित्या ट्रांसप्लांट (Genetically-Modified Pig Heart) केले आहे. वैद्यकीय इतिहासात हा पहिलाच प्रयोग असून यामुळे अवयवदानाच्या (Organ Donation) कमतरतेला सामोरे जाण्यास मदत होईल, असा विश्वास डॉक्टरांना व्यक्त केला आहे. हे ऐतिहासिक ट्रांसप्लांट शुक्रवारी करण्यात आले असल्याची माहिती युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने या संदर्भात एक निवेदन जारी करून दिली आहे.

अनेक आजारांनी रुग्ण त्रस्त

ट्रांसप्लांटनंतर (Transplant) रुग्ण पूर्णपणे बरा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या ट्रांसप्लांटनंतरही सध्या रुग्णाच्या आजारावर उपचार निश्चित नसले तरी ही शस्त्रक्रिया प्राण्यांपासून माणसांमध्ये ट्रांसप्लांटच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. डेव्हिड बेनेट नावाच्या रुग्णाला अनेक गंभीर आजार होते, त्यामुळे त्याला मानवी हृदयाचे ट्रांसप्लांट करता आले नाही. म्हणूनच डॉक्टरांनी त्याला जनुकीय सुधारित डुकराचे हृदय दिले.

डॉक्टरांची नजर हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर

सध्या, रुग्ण बरा होत आहे आणि डुकराचे हृदय त्याच्या शरीरात कसे कार्य करत आहे यावर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 'माझ्याकडे दोनच पर्याय होते, एकतर मरावे किंवा हे हृदय लावून घ्यावे. मला जगायचे होते, मला माहित आहे की हे अंधारात बाण सोडण्यासारखे काम आहे, परंतु तो माझ्यासाठी शेवटचा पर्याय होता, असे मेरीलँडचा रहिवासी डेव्हिडने सांगितले. डेव्हिड गेल्या अनेक महिन्यांपासून हृदय-फुफ्फुसाच्या बायपास मशीनच्या मदतीने अंथरुणावर आहे आणि आता त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमधून बाहेर पडायचे आहे.

गेल्या वर्षी मिळाली मान्यता

नवीन वर्षाच्या आधी, यूएस अन्न आणि औषध प्रशासनाने पारंपारिक ट्रांसप्लांट नसल्यास शेवटचा प्रयत्न म्हणून या आपत्कालीन ट्रांसप्लांटला मान्यता दिली.'याद्वारे आम्ही अवयवांच्या कमतरतेचे संकट दूर करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे, असे शस्त्रक्रियेद्वारे डुकराचे हृदय ट्रांसप्लांट करणारे डॉ. बार्टले ग्रिफिथ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT