S. Jayshankar Dainik Gomantak
ग्लोबल

Video Viral: पाकिस्तानच्या निवडणुकांवर भारताच्या परराष्ट्रमंत्र्याची प्रतिक्रिया ऐकून नागरिकांनीच उडवली खिल्ली

Video Viral: असे असतानाही निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचा मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे.

दैनिक गोमन्तक

Minister of External Affairs of of India S. Jaishankar reaction election in pakistan

पाकिस्तानमधील निवडणुका गेल्या काही दिवसांपासून चर्चांचा विषय बनल्या आहेत. संपूर्ण जगभर पाकिस्तानमधील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर रंगलेले नाट्य यांमुळे चर्चा रंगल्या होत्या. आता शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले असून त्यांनी कामकाजही सुरू केले आहे. असे असतानाही निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचा मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे.

इमरान खान यांच्या पक्ष पीटीआयचे नेते आजही वारंवार सांगत आहेत की, हे सरकार मतांची चोरी करून स्थापन करण्यात आले आहे. पीटीआय आणि पाकिस्तानच्या अनेक संघटनांशिवाय जगातील अनेक शक्तिशाली देश आणि संघटनांकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनसारख्या बड्या देशांनीही निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आत्तापर्यंत यावर भारताने मौन पाळले होते. पण आता एका कार्यक्रमात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पाकिस्तानमधील निवडणूकांवर आधारित प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पाकिस्तान निवडणुकीवर काय वाटते हे ३० सेंकदात सांगू शकता का अशा आशयाचा प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तरादाखल त्यांनी मौन साधले आणि शेवटी ही शांतता मोजली जाऊ शकते का असे खोचक हसत त्यांनी विचारले.

आता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून काही सेकंदांचा हा व्हिडीओ पाकिस्तानमधील अनेक नेटकऱ्यांनी शेअर केला असून एस जयशंकर यांचा हा व्हिडिओ पाकिस्तानच्या निवडणूक आयोग आणि यंत्रणेसाठी हे सर्वोत्तम उत्तर आहे. काहीही न बोलता भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जगाला सांगितले आहे की, या निवडणुकीवर बोलण्यासारखे काही नाही. निवडणुकीत झालेली हेराफेरी लपवणे कठीण आहे हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत जगातील इतर देशांचे नेते अशा प्रकारे देशाची मजाक उडवताना दिसत असल्याचे पाकिस्तानच्या नागरिकांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला मतदान झाले होते. मतदान संपल्यानंतर निकाल जारी करण्यात विलंब केल्याने देशात गदारोळ चालू असल्याचे पाहायला मिळाले होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT