Congo Attack Dainik Gomatak
ग्लोबल

Congo Attack: काँगोमध्ये दहशतवादी हल्ला, चार हल्लेखोरांसह 14 जण ठार!

Congo: विद्रोही गटाच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात 14 जण ठार झाले. कांगो सैन्याने या हल्ल्याची पुष्टी केली आहे.

Manish Jadhav

Congo Attack: आफ्रिकन देश काँगोमधील एका गावावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. विद्रोही गटाच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात 14 जण ठार झाले. कांगो सैन्याने या हल्ल्याची पुष्टी केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नल मपेला मविनियामा यांनी सांगितले की, कोडको विद्रोही गटाचे काही सशस्त्र सैनिक रविवारी संध्याकाळी गोबू गावात घुसले होते.

यादरम्यान त्यांनी बेछूट गोळीबार केला. कांगो सैन्यानेही त्यांना प्रत्युत्तर दिले. यादरम्यान नऊ नागरिक, चार हल्लेखोर आणि एक सैनिक ठार झाला. त्याचवेळी, दोन सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाले.

नायजेरियन सैन्यांवरही हल्ला

नुकतेच आफ्रिकन देश नायजेरियाच्या (Nigeria) उत्तरेकडील भागात लष्करावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक हेलिकॉप्टर कोसळल्याचे नायजेरियन लष्कराने सांगितले होते. यामुळे 36 नायजेरियन सैनिकांचा मृत्यू झाला होता.

संरक्षण प्रवक्ते मेजर जनरल एडवर्ड बुबा यांनी सांगितले की, सशस्त्र गटांनी आमच्या सैनिकांवर हल्ला केला आहे. या गोळीबारात लष्कराच्या तीन अधिकाऱ्यांसह 22 जवान शहीद झाले. तर सात जवान जखमी झाले.

ते पुढे म्हणाले की, मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी वायुसेनेचे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते, पण ते देखील क्रॅश झाले आणि 14 इतर सैनिकांचा मृत्यू झाला.

नायजरमध्येही लष्करी उठाव

नायजेरियन सैन्यावर हल्ल्याच्या काही दिवस आधी शेजारच्या नायजरमध्ये लष्करी उठाव झाला होता. नायजरच्या लष्कराने असा दावा केला आहे की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बजोम यांचे सरकार उलथून टाकले आहे.

त्यांनी अध्यक्ष बजोम यांना तुरुंगात टाकले आहे. UN-US च्या हस्तक्षेपावर आक्षेप घेत सैनिकांनी त्यांना धमकावले.

मिळालेल्या माहितीनुसार, सैनिकांनी नायजरच्या राष्ट्रीय वाहिनीवर सत्तापालटाची घोषणा केली. कर्नल अमादौ अब्द्रमाने आपल्या सहकारी सैनिक आणि अधिकाऱ्यांसोबत टीव्हीवर दिसले होते.

कर्नल अमादौ अब्द्रमाने सांगितले होते की, देशातील ढासळती सुरक्षा व्यवस्था आणि खराब प्रशासनामुळे आम्ही राष्ट्रपती राजवट संपवत आहोत.

नायजरच्या (Niger) सीमा सील केल्या आहेत. आता कोणीही देशाबाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरुन देशात कोणी येऊ शकत नाही. संपूर्ण देशात संचारबंदी आहे. सरकारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

SCROLL FOR NEXT