Michigan State University Dainik Gomantak
ग्लोबल

Michigan State University Shooting: मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत गोळीबार, तीन जण ठार; हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Michigan State University: अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सोमवारी रात्री एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले.

Manish Jadhav

Michigan State University Shooting: अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सोमवारी रात्री एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले. हल्लेखोराने नंतर स्वत:वरही गोळी झाडली.

मंगळवारी पहाटे हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे चार तासांपूर्वी, त्याने बर्क हॉल, शैक्षणिक इमारत आणि जवळच्या MSU युनियनमध्ये गोळीबार केला होता.

कॅम्पस पोलिस विभागाचे अंतरिम उपप्रमुख ख्रिस रोझमन म्हणाले की, “आजची रात्र आमच्यासाठी खूप वाईट होती.” विद्यापीठातील (University) शेकडो अधिकारी संशयिताचा शोध घेत होते.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संशयित हा कमी उंचीचा ब्लॅक व्यक्ती असून त्याने लाल शूज, जाकीट आणि टोपी परिधान केली होती. रोझमन पुढे म्हणाले की, हल्लेखोराचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही आणि त्याचा विद्यापीठाशी काही संबंध होता की नाही हेही कळू शकलेले नाही.

"अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला आत्ता माहित नाहीत," असेही ते म्हणाले. बर्क हॉलमध्ये दोन लोक मारले गेले तर एमएसयू युनियनमध्ये एक व्यक्ती मारला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT